Breaking News
Home / जरा हटके / यावर्षी माझा व्हॅलेंटाईन डे चांगला जाणार आहे.. जुई गडकरीने लग्नाची तारीखच केली जाहीर
jui gadkari valentine day
jui gadkari valentine day

यावर्षी माझा व्हॅलेंटाईन डे चांगला जाणार आहे.. जुई गडकरीने लग्नाची तारीखच केली जाहीर

एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून जुई गडकरी हिच्याकडे पाहिले जाते. ठरलं तर मग या मालिकेतून ती सायलीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे जुईला मोठी लोकप्रियता मिळत आहे. जुई एवढे वर्षे या इंडस्ट्रीत काम करत आहे, पुढचं पाऊल ही तीची पदार्पणातली पहिलीच मालिका खूप गाजली होती. यानंतर ती अनेक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. मधल्या काळात ती बिग बॉसच्या घरातही पाहायला मिळाली. मात्र या घरात तिचे फारसे मन रमलेले पाहायला मिळाले नाही. त्यानंतर आजारपणाबद्दल जुईने धक्कादायक खुलासा केला होता.

jui gadkari wedding
jui gadkari wedding

हळूहळू ती आजारातून बरी होतेय अशी तिने एक पोस्ट केली होती. त्यानंतर जुईच्या मदतीला बांदेकर कुटुंब धावून आले. बांदेकर कुटुंबाने ठरलं तर मग या मालिकेत जुईला प्रमुख भूमिका देऊ केली. या मालिकेमुळे जुई पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यामुळे तिच्या लग्नाची उत्सुकता तिच्या घरच्यांसह सगळ्यांनाच आहे. आणि म्हणूनच जुईने तिच्या लग्नाबद्दल एक खुलासा केला आहे. माझ्या घरात माझं लग्न हे खूप पेंडिंगवालं लग्न आहे. त्यामुळे माझ्याही आधी माझे घरचे लग्नासाठी उत्सुक आहेत. तू फक्त हो म्हण बाकी सगळं रेडी आहे असे माझ्या घरचे म्हणत असतात. २ फेब्रुवारी २०२४ रोजी मी लग्न करणार आहे. २ फेब्रुवारी ही माझ्यासाठी खूप जवळची तारीख आहे. कारण या दिवशी पुढचं पाऊल वर्तुळ आणि आता ठरलं तर मग या मालिकेत माझं लग्न झालं होतं.

actor jui gadkari
actor jui gadkari

त्यामुळे कदाचित मी २ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्न करेन. त्याअगोदर मी एंगेजमेंट काहीतरी करेन तेव्हा तुम्हाला ते नक्कीच समजेल. म्हणून येणारा व्हॅलेन्टाईन डे माझ्यासाठी खूप खास असणार आहे. माझ्या लग्नाची पत्रिका वाटण्याअगोदर मला गो शाळा, काही अनाथाश्रम, निराधार महिलाश्रम आहेत त्यांच्यासाठी काही देणगी देण्याची माझी इच्छा आहे. या सर्वांना मी देणगी देण्यासाठी सक्षम व्हावी आणि त्यानंतरच मी माझ्या लग्नाची पहिली पत्रिका वाटणार आहे असे जुईने तिच्या लग्नाबाबत म्हटले आहे. जुईने अजून तिच्या बॉयफ्रेंडचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र तिच्याच म्हणण्यानुसार तिचा बॉयफ्रेंड लग्नासाठी तयार आहे. अगदी तिच्या घरचे देखील ती लग्नाला कधी हो म्हणणार याची ते वाट पाहत आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.