चित्रपटातील एखाद्या कठीण भूमिकेसाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. रिअल स्टंट करणे असो किंवा चेहऱ्यामध्ये बदल करायचा म्हणून त्यावर ढीगभर मेकअप चढवणे असो, या गोष्टी सर्रास पणे घडलेल्या पहायला मिळतात. मात्र आपल्या एखाद्या भूमिकेसाठी किंवा त्या लूकसाठी तुम्ही रात्रंदिवस जागे राहून ती भूमिका कशी सादर करता हा प्रश्न तुमच्यासमोर आ वासून उभा राहील. खरं तर अशा भूमिकेसाठी एक विशिष्ट प्रकारची मेहनत घ्यावी लागत असते. २०१३ मध्ये 6 कॅंडल्स नावाचा एक तमिळ क्राईम थ्रिलर चित्रपट रिलीज झाला होता. त्यातील दाक्षिणात्य सुपरस्टार शाम म्हणजेच अभिनेता शमशुद्दीन इब्राहिमच्या अभिनय प्रतिभेने प्रेक्षक थक्क झाले होते.
शामने आजवर तमिळ, तेलगू चित्रपटातून अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. 6 कॅंडल्स या चित्रपटात त्याने सहा भिन्न रूपे साकारली, जी खूप प्रशंसनीय ठरली होती. आज आपण या लूकमध्ये त्यांनी केलेल्या कामाबद्दल बोलणार आहोत. 6 कॅंडल्स मध्ये, शामने एका सॉफ्टवेअर अभियंत्याची भूमिका साकारली होती. जो भारतातील सहा वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास करतो आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या लूकमध्ये वावरतो. अशा पद्धतीने तो आपल्या अपहृत मुलाचा शोध घेतो. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अभिनेता शामने या सहापैकी एका लूकसाठी अनेक दिवस झोपेशिवाय काढले होते. चित्रपटासाठी आवश्यक पात्रांमध्ये येण्यासाठी अनेक कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या तयारीत असतात. पण शामने या चित्रपटाला एका वेगळ्याच पातळीवर नेले होते.
२०१२ च्या अहवालानुसार चित्रपटातील सहापैकी एका लूकमध्ये शामच्या डोळ्यांखाली सूज आली होती. मग त्याला तो लूक कसा मिळवला? यासाठी शामने जवळपास १० दिवस रात्र जागून काढले होते. तेव्हा त्याचा लूक इतका कडक झाला की तो ओळखताही येत नव्हता. या भूमिकेसाठी त्याने घेतलेली मेहनत त्याचा लूक पाहून तुमच्या लक्षात येईल. कामाप्रती शामची निष्ठा पाहून त्याचे खूप कौतुक झाले होते.काही दिवसांपूर्वी सरबाजीत या चित्रपटातील रणदीप हुड्डाचा लूक पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. रणदीपने तो लूक मिळवण्यासाठी आपले वजन घटवले होते. २८ दिवसात रणदीपने जवळपास १८ किलो वजन घटवले होते. तेव्हा वजन कमी झाल्याने शरीराची हाडं स्पष्ट दिसू लागली होती. त्यामुळे अशा मेहनत घेतलेल्या कलाकारांचे वर्षानुवर्षे कौतुक केले जाते.