Breaking News
Home / मालिका / यशश्री आणि महेश मांजरेकर यांच्यात झाला मोठा वाद.. मांजरेकर सेट सोडून गेले निघून
yashashri masurkar majesh manjrekar
yashashri masurkar majesh manjrekar

यशश्री आणि महेश मांजरेकर यांच्यात झाला मोठा वाद.. मांजरेकर सेट सोडून गेले निघून

मराठी बिग बॉसचा शो गेल्या आठवड्यापासून चांगलाच चर्चेत आला आहे. एका टास्कमध्ये किरण माने आणि विकासच्या खेळीवर सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं. त्यामुळे बिग बॉसचा टीआरपी मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसला होता. बिग बॉसचा शो हा स्क्रिप्टेड असतो असे अनेक प्रेक्षकांना वाटते; कारण या घरातली मंडळी विकेंडच्या चावडीवर नटून थटून येत असतात. त्यावेळेसचे फोटो हे सदस्य आपल्या सोशल अकाउंटवर शेअर करताना दिसतात. बऱ्याचदा या घरात साफसफाई पाहायला मिळते, त्यामुळे देखील इथे बाहेरचे सफाई कर्मचारी ये जा करत असणार.

yashashri masurkar majesh manjrekar
yashashri masurkar majesh manjrekar

तसेच मेकअप आर्टिस्ट देखील सदस्यांचा मेकअप करून देत असणार अशी शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. बिग बॉसच्या शोबाबत आणखी एक बाब नुकतीच निदर्शनास आली आहे. यशश्री मसुरकर आणि महेश मांजरेकर यांचा चावडीवर जोरदार वाद झालेला होता. ही बातमी तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना देखील चांगलीच माहिती आहे. या वादामुळे महेश मांजरेकर यशश्रीवर खूप भडकले होते आणि ते रागात सेट सोडून निघून गेले होते. रविवारी त्रिशूल मराठे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. त्यावेळी अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर यांना खूपच दुःख झाले होते. शनिवारी चावडीवर महेश मांजरेकर यांनी किरण माने आणि विकासचं कौतुक केलं, तर अपूर्वा आणि यशश्रीला त्यांनी खडेबोल सुनावले.

yashashri masurkar big boss marathi
yashashri masurkar big boss marathi

एका टास्क बद्दल त्यांनी यशश्रीला जाब विचारला असता ती महेश मांजरेकर यांच्याशी वाद घालू लागली. त्यात यशश्रीने महेश मांजरेकर यांना टोला देखील लगावला, तेव्हा मांजरेकर तिच्यावर खूप चिडले. हे पाहून यशश्री देखील वाद घालू लागली. हा वाद उपस्थितांनी पाहिल्याने सध्या या घटनेची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. यावर यशश्रीला बॅग भर आणि निघ घरातून असा सूचक ईशारा मांजरेकरांनी दिला. अखेर बिग बॉसच्या टीमला एकतर ही बाहेर जाईल नाहीतर मी हा शो सोडेल असा धमकी वजा ईशारा दिला आणि ते सेट सोडून निघून गेले. त्यामुळे ह्या आठवड्यात यशश्री नॉमिनेट होऊन घरातून बाहेर पडावे लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे. हा सीन कट केल्याने प्रेक्षकांना ते पाहायला मिळाले नाही.

मात्र उपस्थितांनी हे प्रत्यक्षात अनुभवल्यामुळे ही चर्चा आता सर्वत्र रंगलेली पाहायला मिळत आहे. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनमध्ये देखील असाच एक शॉट कट करण्यात आला होता. जेव्हा पराग कान्हेरेने नेहा शितोळेच्या कानाखाली वाजवली होती. हा भाग प्रेक्षकांना टीव्हीवर दाखवण्यात आला नव्हता, मात्र या वादामुळे परागला बिग बॉसच्या शोमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे बिग बॉसच्या शोमध्ये कधी काय घडेल हे सांगता येणे कठीण आहे. मात्र कॅमेऱ्यात कैद झालेल्या या गोष्टी जरी टीव्ही माध्यमातून दाखवण्यात आल्या नसल्या तरी त्यामुळे या शोला एक वेगळे वळण तर नक्कीच मिळालेले आहे. त्यामुळे ह्या आठवड्यात यशश्री बाहेर जाणार का हे पाहावे लागेल.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.