Breaking News
Home / जरा हटके / ही आहे जगातील सर्वात सुंदर मुलगी, लोक म्हणतात डिंपल प्रिंसेस
anahita world cute baby
anahita world cute baby

ही आहे जगातील सर्वात सुंदर मुलगी, लोक म्हणतात डिंपल प्रिंसेस

​मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स अशा अनेक सौंदर्य आणि बुद्धीचातुर्याच्या स्पर्धा आपल्या सर्वांना माहित आहेतच. या​​मध्ये आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जगातील सुंदर आणि बुद्धिमान तरुणींना परफॉर्मन्स द्वारे स्वतःला सिद्ध करायचे असते. मध्यंतरी रुसमधील यलीना यकूपोवा या सहा वर्षांच्या लहान मुलीला जगातील सर्वात सुंदर मुलगी म्हणून घोषित करण्यात आले होते. पण याहूनही सुंदर निरागस लहानगी सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे…

anahita hashemzade world cute baby girl
anahita hashemzade world cute baby girl

रोज येणाऱ्या व्हाट्स ऍप फेसबुकवरील गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेजेस मधून तुम्ही ह्या परीला नक्की पाहिलेले असणार. बोलके निळसर डोळे, कुरळे केस आणि गोंडस हास्यातील खळीचे सुंदर व्हिडीओ आणि फोटो पाहून लहान थोरांना आपलीशी वाटावी इतकी ती निरागस आहे. मूळची इराण मधील असलेल्या या सुंदर परीचे नाव आहे अनाहिता हशमीनेझाद. १० जानेवारी २०१६ रोजी इराण मधील इशफुहन शहरात जन्मलेल्या या परीचे सोशल मीडिया अकाउंट आई मरिअम आणि वडील अली चालवीत असून तिचे व्हिडीओ अतिशय लोकप्रिय होत आहेत. तिच्या सुंदरतेमुळे आता लोक तिला चिमुकली डिंपल प्रिंसेस असेही संबोधित आहेत. केवळ पाच वर्षांच्या या चिमुकलीला फेसबुक, युट्युब आणि इंस्टाग्रामवर मिळून १० लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

cute princes anahita
cute princes anahita

तीन वर्षांची असल्या पासून किड्स फॅशन मॉडेलिंग करीत असलेल्या चिमुकल्या अनाहिताने अनेक नामांकित कंपन्यांसाठी जाहिरात केल्या. मोठमोठया ब्रँड, मॅगझीन कव्हरसाठी तिने व्यावसायिक फोटोशूट केले, या सर्वांतून अनाहिताची ख्याती सुंदरता आणि निखळ हास्यासाठी जगभर पोहोचली. मागील तीन वर्षांत तिने ७ लाख डॉलर्स इतकी भरघोस रक्कम आपल्या पालकांना मिळवून दिली आहे. विश्वसुंदरीं पेक्षाही काकणभर जास्त सुंदर अशी हि अनाहिता तुम्हाला आवडली असल्यास कमेंट करून कळवायला विसरू नका.

anahita with mother mariyam
anahita with mother mariyam

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.