Breaking News
Home / जरा हटके / बिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण

बिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण

मराठी बिग बॉसच्या घरात या आठवड्यात एक दोन नव्हे तर तब्बल चार सदस्यांनी एन्ट्री केलेली आहे. त्यामुळे बिग बॉसचा टीआरपी वाढणार अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. हे चारही सदस्य केवळ चॅलेंजर्स म्हणून या घरात दाखल झालेले आहेत. त्यामुळे किती दिवसांसाठी त्यांना या घरात राहावे लागणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. कदाचित एक ते दोन आठवड्यात हे सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता विशाल निकम या घरात एन्ट्री करत असल्याचे पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.

vishhal nikam big boss winner
vishhal nikam big boss winner

एंटरटेनमेंट क्वीन समजल्या जाणाऱ्या राखी सावंतच्या एंट्रीला देखील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. राखीने हिंदी बिग बॉसचे तिन्ही सिजन गाजवले होते, त्यामुळे मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनसाठी तिला आमंत्रित करण्यात आले. आयोजकांचा हा निर्णय कितपत योग्य ठरतो हे येणारा काळच ठरवेल. पहिल्याच दिवशी राखीच्या भूमिकेमुळे विशालसोबत तिचा वाद झालेला पाहायला मिळाला आहे. अर्थात विशालने देखील चोख प्रतिउत्तर देत राखीची बोलती बंद केली. त्यामुळे विशालवर कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो. विशाल सध्या आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. मागच्या सीजनमध्ये सौंदर्याबद्दल त्याने बोलले होते. मात्र ही सौंदर्या नक्की कोण याचा खुलासा करण्याचे त्याने टाळले होते.

amruta dhongade vishhal nikam
amruta dhongade vishhal nikam

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्याला अनेकदा सौंदर्याबद्दल विचारले जात होते. शेवटी कंटाळून त्याने सौंदर्याचे आणि माझे ब्रेकअप झाले आहे असे त्याने स्पष्टीकरण दिले. आता आमच्यात असं काहीच नाही म्हणत त्याने हा विषय संपवला होता. मात्र विशालने बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच अमृता धोंगडे म्हणाली होती की, ‘ज्याची भीती होती तेच झालं’. अमृता धोंगडे असं का म्हणाली याबाबत आता प्रेक्षकांनी तर्क लावण्यास सुरुवात केली आहे. अमृता हीच विशालची सौंदर्या असावी म्हणून ती असं बोलली असे मत व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी तेजस्विनीने देखील तुमच्यात काही होतं का असा प्रश्न अमृताला विचारला होता. तेव्हा ती नाही असं बोलली. 

विशाल आणि अमृता धोंगडे यांनी मिथुन चित्रपटातून एकत्रित काम केले होते. बिग बॉसच्या घरात आल्यावर विशालने अमृताजवळ जाऊन ‘धोंगडे मैत्रीत खूप ताकद आहे’ असे म्हटले होते. तेजस्विनी आणि अमृताची चांगली मैत्री जुळली होती, पण तेजस्वीनीने एक नंबर पटकावला म्हणून ती तिच्यावर नाराज होती. याच अनुषंगाने विशालने धोंगडेला समज देण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याच वर्षांपासून या दोघांची ओळख असल्याने विशालची सौंदर्या हीच आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मात्र चित्रपटानंतर हे दोघेही कधी फारसे एकत्र पाहायला मिळाले नसल्याने ह्या शक्यतावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.