Breaking News
Home / मराठी तडका / मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची लगीनघाई.. २ फेब्रुवारी रोजी होणार थाटात लग्न

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची लगीनघाई.. २ फेब्रुवारी रोजी होणार थाटात लग्न

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली वनिता खरात येत्या २ फेब्रुवारी २०२३ रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या महिनाभरापासून वनीताची लगीनघाई सुरू झालेली होती. वनिता खरात आणि सुमित लोंढे यांनी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे हे दोघे लवकरच लग्न करणार असे बोलले जात होते. त्यानंतर दोघांनी लीपलॉक केलेले प्रिवेडिंगचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमूळे वनिता आणि सुमित चांगलेच चर्चेत आले. येत्या दोन दिवसात म्हणजेच गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी वनिता आणि सुमितच्या लग्नाचा बार उडणार आहे. गेल्या महिनाभरापासून वनीताच्या लग्नाची खरेदी सुरू होती.

vanita kharat wedding
vanita kharat wedding

हास्यजत्रामधील सहकलाकारांनी यात तिला मोठी मदत केली होती. काल वनीताच्या घरी मेहेंदीचा सोहळा पार पडला. सुमितने त्याच्या हातावर ‘वनी’च्या नावाची मेहेंदी सजवली. या सोहळ्याला हास्यजत्राच्या कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली होती. ईशा डे, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, आरती मोरे, शिवाली परब यांनी देखील वनीताच्या लग्नानिमित्त हातावर मेहंदी काढून घेतली. आज वनिता आणि सुमितच्या लग्नाची हळद, उद्या संगीत सोहळा आणि परवा त्यांचे थाटात लग्न पार पडणार आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून वनिता खरात हिने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आपल्या विनोदी अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात आपली स्वतःची एक वेगळी ओळख बनवली. वनिताने केवळ विनोदीच भूमिका केल्या असे नाही. तुझेच मी गीत गात आहे मालिकेत ती सहाय्यक भूमिकेत पाहायला मिळाली होती.

vanita kharat sumeet londhe
vanita kharat sumeet londhe

याशिवाय बॉलिवूड चित्रपटातूनही तिला मोठी प्रसिद्धी मिळालेली आहे. कबीर सिंग चित्रपटामुळे वनिता बॉलिवूड सृष्टीत सुद्धा हिट झाली. मात्र बॉडी शेमिंगमुळे तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. याला उत्तर म्हणून वनिताने एक न्यूड फोटो शूट केलं होतं. तिचा हा फोटो तुफान व्हायरल झाला होता. बॉडी शेमिंगवर बोलणाऱ्यांना तिने या फोटोतून एक मेसेज दिला होता. तेव्हा सहकलाकारांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. पोस्ट ऑफिस उघडं आहे, सरला एक कोटी, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा वेगवेगळ्या मालिका चित्रपटातून वनिताने तिच्या सहजसुंदर अभिनयाची झलक दाखवून दिली होती. लग्नासाठी वनिताने हास्यजत्रा आणि पोस्ट ऑफिस उघडं आहे या दोन्ही मालिकांमधून ब्रेक घेतलेला आहे. तिच्या लग्नाची ही धामधूम पाहायला प्रेक्षक देखील तेवढेच उत्सुक आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.