Breaking News
Home / जरा हटके / वंदना गुप्ते यांनी शिरीषसोबत पुन्हा एकदा केले लग्न.. सेलिब्रिटींनी केला अभिनंदनाचा वर्षाव

वंदना गुप्ते यांनी शिरीषसोबत पुन्हा एकदा केले लग्न.. सेलिब्रिटींनी केला अभिनंदनाचा वर्षाव

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते या पुन्हा एकदा बोहल्यावर चढल्या आहेत. त्याला कारणही तसेच खास आहे. वंदना गुप्ते यांनी शिरीष गुप्ते यांच्या सोबत ५० वर्षांपूर्वी लग्नाची गाठ बांधली होती. आज त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. मात्र सेलिब्रेश कसे करायचे हे त्यांच्या मुलांनी अगोदरच प्लॅन करून ठेवले होते. त्यासाठी गेल्या काही दिवसां पूर्वीपासूनच लग्नाची लगबग आणि धावपळ सुरू होती. त्यांची मुलगी स्वप्ना वेस्टइंडिजला असते. आपल्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस तीला वेगळ्या अंदाजात साजरा करायचा होता. म्हणून मग जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने तिने सोहळ्याची जय्यद तयारी केली होती.

vandana gupte marriage
vandana gupte marriage

अगदी कपाळावर मुंडावळ्या घालून वंदना आणि शिरीष गुप्ते लग्नाच्या बोहल्यावर चढले होते. सोबत मंगलाष्टके देखील म्हटली गेली. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात ५० वर्षांनी पुन्हा एकदा वरमाला घातली. हा सोहळा पुन्हा एकदा अनुभवताना वंदना आणि शिरीष गुप्ते कौतुकाने भारावून गेले होते. आपल्या लग्नाचा वाढदिवस अशा पद्धतीने कधी साजरा होईल याची कल्पना देखील त्यांनी केलेली नव्हती. वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते यांची भेट घडून असली ती एका नाटकामुळे. जसमा ओडन या नाटकात वंदना गुप्ते काम करत होत्या. नाटक पाहायला शिरीष तिथे गेले असता, पहिल्याच नजरेत शिरीष यांना वंदना गुप्ते आवडू लागल्या. पुढे त्यांच्यात मैत्री वाढली आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या लग्नाच्या वाढदिवशी कोणीकोणी कसे प्लॅनिंग केले होते.

vandan gupte shirish gupte
vandan gupte shirish gupte

लग्नाचा आढावा त्यांनी एका पोस्टमधून देत म्हणाल्या की, सत्यापित, आमचा ५० वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला! माझ्या वहिनी आणि भाची युएसए आणि कॅनडाहून सर्वत्र विमानाने प्रवास करत इथपर्यंत आले. आमची लाडकी मुलगी, स्वप्ना, आमच्या खास दिवशी आमच्यासोबत राहण्यासाठी वेस्ट इंडीजहून आली! तिने घरी एक छोटासा विवाह सेटअप लावला. जेणेकरून आम्ही आमचे सर्वात मौल्यवान क्षण पुन्हा एकदा अनुभवू शकू. आमची मुलं हजेरी लावू शकतील आणि आमच्या लग्नाचा आनंद घेऊ शकतील याचा मला आनंद झाला! तूमच्या हृदयस्पर्शी उपस्थितीने आमचा दिवस अधिक खास बनवल्याबद्दल सर्वांचे आभार! वंदना गुप्ते यांनी या सोहळ्याचे काही खास क्षण शेअर केले आहेत. त्यावर मराठी सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करत गोड गोड प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.