Breaking News
Home / जरा हटके / नारी इन सारी म्हणत ऊर्मिला निंबाळकरने घातला धुमाकूळ.. नेटकऱ्यांना फुटला घाम

नारी इन सारी म्हणत ऊर्मिला निंबाळकरने घातला धुमाकूळ.. नेटकऱ्यांना फुटला घाम

कितीही स्टायलीश फॅशन करा, नव्या ट्रेंडसचे ड्रेस घालून मिरवा, पण साडी ती साडीच. अभिनेत्रींच्या कपाटात तर साड्यांसाठी खास जागा असते. सोशल मिडियावर कितीही सेक्सी लुक शेअर केला तरी साडीतील एक फोटो देखील कमेंटचा पाऊस पाडतो. साडीचं इतकं कौतुक चाललंय त्याला कारणही खास आहे. अभिनेत्री आणि यूट्यूबवर फॅशन फंडा सांगून लाखो लाइक्स घेणाऱ्या ऊर्मिला निंबाळकरने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे तो या साडीमुळेच. ऊर्मिलाच्या या साडी लुकने अशी काही आग लावलीय की ऐन श्रावणात नेटकऱ्यांना घाम फुटलाय.

urmila nimbalkar naari in saree
urmila nimbalkar naari in saree

मोजक्याच मालिका आणि सिनेमात अभिनयाची आणि डान्सची झलक दाखवून ऊर्मिला निंबाळकर सध्या यूट्यूबवर जास्त रमली आहे. तिच्या यूट्यूब चॅनेलवरून फॅशनचे धडे गिरवणाऱ्या तिच्या लाखो फॉलोअर्सचं लक्ष तिच्या नव्या पोस्टकडे लागलेलं असतं. मेकअप आणि स्टाइलचे पाठ शिकवणारी ऊर्मिलाही स्वत:ही सतत नवे प्रयोग करून तिचा लुक शेअर करत असते. आता नुकताच ऊर्मिलाने साडीतला लुक शेअर केला आहे. पण हा फोटो पाहून तिच्या घायाळ करणाऱ्या सौंदर्यानं नेटकरी चांगलेच घामाघूम झाले आहेत. ऊर्मिलाने शेअर केलेल्या फोटोत ती लाल रंगाच्या प्रिंटेड कॉटन साडी आणि निळया रंगाच्या ऑफशोल्डर ब्लाऊजमध्ये दिसत आहे.

urmila nimbalkar
urmila nimbalkar

एका अँटीक सोफ्यावर रिलॅक्स मूडमध्ये बसलेल्या ऊर्मिलाकडे पहायचं की तिच्या साडीकडे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला नसेल तरच नवल. दुसऱ्या फोटोत सोफ्यावर मांडी घालून बसलेल्या ऊर्मिलाची अदाही खास आहे. या दोन्ही फोटोला तिने नारी इन सारी अशी हटके कॅप्शनही दिली आहे. ऊर्मिलाच्या फॅशन आणि मेकअपबाबत टीप्स देणाऱ्या व्हिडिओला जोरदार हिट मिळतातच, पण तिच्या या स्पेशल फोटोंनीही कमेंटचा गल्ला जमवला आहे. ऊर्मिलाने गेल्या वर्षी मुलाला जन्म दिला, त्यानंतर ती काही दिवस यूट्यूबवरून गायब होती. आता मात्र पुन्हा ऊर्मिला तिच्या व्हिडिओबरोबरच फोटोसेशन करतानाही दिसत आहे. त्यामुळेच साडीतील हा सेक्सी फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी एक से एक कमेंट केल्या आहेत. 

एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की ही तर सेक्सी मॉम आहे. तर दुसरा एक नेटकरी म्हणतोय, ये माझी बाय, धुमाकूळ घातलाय पाव्हणीनं. एक वर्षाच्या सश्याची आई तूच का. पावणी आणि जाळ अशीही एक कमेंट लक्ष वेधून घेत आहे. कुणी तिला हॉट मम्मी म्हटलंय तर कुणी धुरळा उडवणारी पाव्हणी अशी उपमा दिलीय. लई झ्यॉक अशी रांगडी कमेंटही एकाने केली आहे. एकीकडे ऊर्मिलावर स्तुतीसुमनं उधळली जात आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केलंय. असे फोटो पोस्ट करणं योग्य नाही असं मत मांडलंय. ऊर्मिलाचे व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल होतातच पण सध्या मात्र तिचा नारी इन सारी लूक धुरळा उडवतोय.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.