Breaking News
Home / मराठी तडका / आदिनाथ आणि उर्मिला यांच्या चर्चेला मिळाला पूर्णविराम.. उर्मिलानेही दिली प्रतिक्रिया

आदिनाथ आणि उर्मिला यांच्या चर्चेला मिळाला पूर्णविराम.. उर्मिलानेही दिली प्रतिक्रिया

​​गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक विषय चर्चेत आला आहे, तो म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचे. मिडिया माध्यमातून हा विषय एवढा हाताळला जात आहे की​​ त्यांना अ​​खेर याबाबत मौन सोडावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी पासून आदिनाथ कोठारे चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये होता. तो नेहमी अमृता खानविलकरसोबत विविध ठिकाणी जाऊन या चित्रपटाचे प्रमोशन करताना पाहायला मिळाला. मात्र त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी उर्मिलाने एकदाही हजेरी लावली नाही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावरूनच या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा जोर धरताना दिसली. त्यानंतर उर्मिलाचा ४ मे रोजी वाढदिवस होता.

urmila kothare adinath kothare
urmila kothare adinath kothare

मात्र या दिवशी देखील आदिनाथने उर्मिलाला साध्या शुभेच्छा देखील दिल्या नसल्याने, ह्या चर्चा अधिक रंगवल्या जाऊ लागल्या. याशिवाय उर्मिलाने आदिनाथला सोशल मीडियावर अनफॉलो केले असल्याचेही म्हटले गेले. मात्र ह्या सर्व गोष्टी आपल्या खाजगी आयुष्यबाबत उघडउघड बोलल्या जात असल्याने शेवटी आदिनाथने यावर प्रतिक्रिया देण्याचा निर्णय घेतला. मीडियाला याबाबत प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की, मीडियाच्या माध्यमातून ज्या काही चर्चा रंगवल्या जात आहेत त्या केवळ अफवा आहेत. यासर्व गोष्टींकडे मी आणि उर्मिला कधीच लक्ष देत नाहीत. ती मालिकेनिमित्त कामात व्यस्त आहे तर मी गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होतो. आमच्यात असं काहीही बिनसलेलं नाही.

urmila kothare
urmila kothare

आदिनाथ पाठोपाठ आता उर्मिलाने देखील या चर्चेला पूर्णविराम दिलेला पाहायला मिळतो आहे. १३ मे रोजी आदिनाथचा वाढदिवस असतो, त्याचे औचित्य साधून उर्मिलाने आदिनाथसाठी शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘तुला आठवतंय’ असे म्हणत उर्मिलाने आदिनाथला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्काय डायव्हिंग करतानाचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यात तिने म्हटले आहे की, या सुंदर दिवसांची आठवण येतीये. आदिनाथ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू उंच भरारी घे आणि तुझे जे ध्येय्य आहे त्याही पेक्षा तू अधिक यश मिळव. माझी प्रार्थना आणि माझ्या शुभेच्छा कायम तुझ्यासोबत असतील. असे म्हणत अखेर उर्मिलाने या चर्चांना आता पूर्णविराम दिलेला पाहायला मिळतो आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.