Breaking News
Home / मालिका / थुकरटवाडीत रितेश देशमुख घासणार भांडी.. जेनेलियाने हटके अंदाजात केली साबणाची जाहिरात

थुकरटवाडीत रितेश देशमुख घासणार भांडी.. जेनेलियाने हटके अंदाजात केली साबणाची जाहिरात

​​चला हवा येऊ द्याच्या मंचावर महाराष्ट्राची लाडकी जोडी अर्थात रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांनी हजेरी लावली आहे. कालच्या भागात रितेश देशमुखच्या माऊली या चित्रपटाचे ​प्रसंग सादर करून भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे आणि इतर कलाकारांनी प्रेक्षकांची दाद मिळवली होती. तर जेनेलियाने मराठीत उखाणा घेऊन आणि शोमध्ये मराठीतच बोलणार असल्याचे सांगून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

thukratwadi chala hawa yeudya ritesh genelia
thukratwadi chala hawa yeudya ritesh genelia

आजच्या भागात रितेश देशमुख थुकरटवाडीत भांडी घासताना दिसणार आहे. अर्थात हा देखील ​​स्किटचा एक भाग अस​​ल्याने तो​​ निंबुडा साबणाची जाहिरात करताना दिसतो खरकट्या भांड्यांची चिंता सोडा, वापरा साबण निंबुडा…​ ​त्यावर जेनेलियाची प्रतिक्रिया देखील खूपच भन्नाट दिलेली पाहायला मिळते. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे दोन्ही ​दांपत्य ​​​​विगन आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते दोघेही शुद्ध शाकाहारी अन्न पदार्थ खात असून प्राण्यांचे कुठलेच प्रथिनयुक्त पदार्थ खाणे त्यांनी आवर्जून टाळले आहे. आपल्या आहारातून मांस, मासे आणि अंडी देखील त्यांनी वर्ज्य केली आहेत. इतकंच काय, पण हे दोघेही दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ ​खाण्याचे आवर्जून टाळत आहेत.​ ​​​विगन या कडक शाकाहाराच्या अमेरिकन संकल्पनेत प्राण्यांपासून मिळणारे सर्व पदार्थ​ टाळले जातात. नियमित व्यायामासोबत गेल्या ५ वर्षांपासून रितेश आणि जेनेलिया खाण्याच्या बाबतीतले हे नियम काटेकोरपणे पाळताना दिसत आहेत, असे असले तरी चिकन आणि मटण सारख्या पदार्थांची आठवण खाणाऱ्यांना अनेकदा येते.

ritesh genelia enjoys nimbuda soap
ritesh genelia enjoys nimbuda soap

शाकाहारी लोकांना देखील असे पदार्थ चाखता यावेत या हेतूने त्यांनी मटण आणि चिकनचा फील देणारे खाद्य पदार्थ बाजारात आणले आहेत.अमेरिका, जर्मनी आणि भारतातील सायंटिस्ट आणि टेक्नॉलॉजी वापरून “इमॅजिन मिट्स” नावाने त्यांनी खाद्यपदार्थांची कंपनी सुरु केली आहे. हे सगळे पदार्थ शाकाहारी आहेत जे डायरेक्ट प्लॅन्टस मधून येतात. नगेट्स, सिककबाब, बिर्याणी असे सुरुवातीला ९ रेडी टू ईट खाद्यपदार्थ त्यांनी मार्केटमध्ये आणले आहेत, जे झिरो कोलेस्ट्रॉल आणि हाय प्रोटीन पासून बनवले आहेत. चांगल्या आरोग्य जीवनशैली साठी जे नॉनव्हेज खाऊ शकत नाहीत त्यांना हि टेस्ट सेम मटण खाल्ल्यासारखीच लागेल, पण हे पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे. ह्या खाद्य पदार्थांच्या जाहिरातीसाठी त्यांनी कौन बनेगा करोडपती या शो मध्ये हजेरी लावली होती शिवाय काही वृत्त वाहिनीच्या माध्यमातून देखील त्यांनी आपल्या व्यवसायाची ओळख करून दिली होती. याच हेतूने ते चला हवा येऊ द्या च्या मंचावर देखील हजेरी लावलेली दिसून येते.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.