Breaking News
Home / मालिका / तेजस्विनी लोणारीने बिग बॉसच्या घरात येण्याचे दिले संकेत.. आता अभिनयासोबतच निवडणार आणखी एक क्षेत्र
tejaswini lonari as producer
tejaswini lonari as producer

तेजस्विनी लोणारीने बिग बॉसच्या घरात येण्याचे दिले संकेत.. आता अभिनयासोबतच निवडणार आणखी एक क्षेत्र

मराठी बिग बॉसच्या घरात सध्या सदस्यांची शाळा भरलेली आहे, त्यामुळे ह्या आठवड्यात सर्व सदस्य बालपणात दंग होऊन मजामस्ती अनुभवत आहेत. विशाल निकमने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही त्याचं मन अजूनही ह्या घरातच आहे असं म्हटलं आहे. त्यावरून त्याच्या फॅनने त्याची सौंदर्या ही दुसरी तिसरी कोणी नसून अमृता धोंगडेच आहे असे खात्रीशीर म्हटले आहे. या चर्चा होत असतानाच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली तेजस्विनी प्रथमच प्रेक्षकांच्या समोर आलेली पाहायला मिळाली. हाताला दुखापत झाल्यामुळे तेजस्विनीला बिग बॉसचे घर सोडावे लागले होते. तेजस्विनी बिग बॉसच्या चौथ्या सिजनच्या विजेत्याची दावेदार होती.

tejaswini lonari as producer
tejaswini lonari as producer

तिला असे अचानक बाहेर पडताना पाहून प्रेक्षकांनी आणि तमाम चाहत्यांनी नाराजी दर्शवली होती. बिग बॉसच्या निर्णयावर अनेकांनी विरोध दर्शवला, तिला पुन्हा घरात घेण्याची मागणी देखील करण्यात केली. परंतु बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तेजस्विनी मीडियासमोर आली नसल्याने तिच्या बाहेर पडण्यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. कारण याअगोदर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या सदस्यांनी समोर येऊन मुलाखती दिल्या होत्या. मात्र तेजस्विनी तसे काहीच करताना दिसली नाही. आपल्या चाहत्यांचे आपल्यावरील प्रेम पाहून तिने एक भावनिक पोस्ट लिहिली होती. हॉटेलमधील कर्मचारी, भेटलेले आजोबा, घरी सोडणारे ड्रायव्हर यांची प्रतिक्रिया तिला भारावून सोडणारी होती.

tejaswini lonari comeback in big boss
tejaswini lonari comeback in big boss

मात्र यानंतर जवळपास एका आठवड्यानंतर काल प्रथमच तिने लाईव्ह येऊन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने तिच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील दिली. प्रेक्षकांचे आपल्यावरील प्रचंड प्रेम पाहून अगोदर तिने या सर्वांचे खूप आभार मानले. यावेळी तिने मालिकेतून पुन्हा तेवढ्याच उत्स्फूर्तपणे काम करेन असेही आश्वासन दिले. निर्मिती क्षेत्रात उतरत असल्याची घोषणा देखील केली. लवकरच मी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. एका चाहत्याने तिला पुन्हा बिग बॉसच्या घरात पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ती पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार असल्याचे सांगितले.

हाच सिजन नाही तर मी कुठल्याही बिग बॉसमध्ये गेले तरी तिथे त्याच स्पिरिटने खेळेल असेही आश्वासन तिने दिले. त्यामुळे येत्या काळात ती पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार अशी आशा निर्माण झाली आहे. तेजस्विनी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची विजेती आहे असे तिच्या तमाम चाहत्यांनी जाहीर केले होते. तिने पुन्हा या घरात येऊन बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी अशी मते व्यक्त केली जात आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात ती या घरात पुन्हा परतणार का याचे उत्तर लवकरच मिळेल.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.