Breaking News
Home / मराठी तडका / तब्ब्ल १९ वर्षानंतर नवरा माझा नवसाचा २.. स्वप्नील जोशीसह झळकणार हे कलाकार
swapnil joshi sachin pilgaonkar hemal ingle
swapnil joshi sachin pilgaonkar hemal ingle

तब्ब्ल १९ वर्षानंतर नवरा माझा नवसाचा २.. स्वप्नील जोशीसह झळकणार हे कलाकार

सचिन पिळगावकर अभिनित आणि दिग्दर्शित “नवरा माझा नवसाचा” हा चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आपल्या वडिलांनी केलेला विचित्र नवस फेडण्यासाठी नायक नायिकेला काय कसरत करावी लागली होती, हे या चित्रपटात सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी दाखवुन दिले होते. त्यांना साथ मिळाली ती अशोक सराफ, मधुराणी प्रभुळकर, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर, जयवंत वाडकर यांची. या चित्रपटात सोनू निगम, रिमा लागू, अली असगर हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले होते. हिरवा निसर्ग, चला ना गडे, चला जेजुरीला जाऊ ही चित्रपटातील गाणी लोकप्रियता मिळवताना दिसली होती.

hemal ingle swapnil joshi
hemal ingle swapnil joshi

तब्बल १९ वर्षानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असे सचिन पिळगावकर यांनी नुकतेच जाहीर केले आहे. काल या चित्रपटाच्या शुटिंगचा मुहूर्त सोहळा पार पडला. नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाची घोषणा करताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची आतापासूनच उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान हा चित्रपटही मल्टी स्टारर असणार हे निश्चित झाले आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार हे जाणून घेऊयात. नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटात पुन्हा एकदा सचिन सुप्रियाची जोडी पाहायला मिळणार आहे. त्यांच्या जोडीला अभिनेत्री हेमल इंगळे आणि स्वप्नील जोशी महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार हे समोर आले आहे. याशिवाय अशोक सराफ, जयवंत वाडकर, निर्मिती सावंत, अली असगर, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, संतोष पवार, जितेंद्र कुलकर्णी, दीपाली विचारे, अजिंक्य शिंदे अशी भली मोठी स्टार कास्ट चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

navra maza navsacha part 2
navra maza navsacha part 2

चित्रपटाचे दिग्दर्शन तसेच निर्मिती स्वतः सचिन पिळगावकर यांचीच असणार आहे. चित्रपटाचे कथानक पुन्हा एकदा नवसावरच अवलंबून असणार आहे. सिद्धिविनायकाचा हा नवस फेडण्यासाठी कलाकारांना काय काय कसरत करावी लागणार आहे हे तुम्हाला चित्रपटातूनच पाहायला मिळेल. तूर्तास स्वप्नील जोशी चित्रपटाचा भाग असल्याने तो या नवीन भूमिकेबाबत खूपच उत्सुक आहे. हेमल इंगळे हिने याअगोदर सचिन पिळगावकर यांच्या अशी ही आशिकी या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. नवरा माझा नवसाचा २ चित्रपटातून स्वप्नील जोशी सोबत ती प्रथमच स्क्रीन शेअर करत आहे. तर पहिल्या भागात झळकलेले बरेचसे कलाकार तुम्हाला दुसऱ्या भागातही पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाचे स्वागत केलेले पाहायला मिळत आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.