Breaking News
Home / मराठी तडका / सुनील तावडेच्या लेकीचा धुमधडाक्यात लग्नसोहळा.. कलाकारांची जमली मांदियाळी

सुनील तावडेच्या लेकीचा धुमधडाक्यात लग्नसोहळा.. कलाकारांची जमली मांदियाळी

मराठी सृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांच्या लेकीचा धुमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला आहे. लग्नसोहळ्याला मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सुनील तावडे यांची लेक अंकिता तावडे हिने प्रवीण वारक सोबत लग्न केले आहे. लग्नाला संस्कृती बालगुडे, अनघा अतुल, प्रथमेश परब, मुग्धा कर्णिक, मानसी नाईक, आशिमिक कामठे या सेलिब्रिटींनी हजेरी लावून सोहळ्याला अधिक रंग चढवला होता. आपल्या मुलीच्या लग्नात सुनील तावडे यांनी देखील गाण्यांवर ठेका धरलेला पाहायला मिळाला. अंकिता तावडे ही निर्माती आहे.

sunil tawde daughter ankita
sunil tawde daughter ankita

स्टार प्रवाह वाहिनीसाठी ती सिनिअर प्रोड्युसर म्हणून काम करते. सुनील तावडे हे गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीशी जोडले गेले आहेत. मराठी मालिका, चित्रपटातून त्यानी आपल्या सजग अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. विनोदी भूमिका असो वा गंभीर भूमिका त्यांनी अगदी नेटाने निभावलेल्या पाहायला मिळतात. सुनील तावडे यांचे पणजोबा म्हणजेच दिग्गज मराठी सिने अभिनेते दादा साळवी होय. दादा साळवी हे सुनील तावडे यांच्या आईचे आजोबा, त्यामुळे अभिनयाचे उपजत गुण त्यांना घरातूनच, आजोबांकडून मिळाले असे म्हणायला हरकत नाही. सुनील तावडे आणि सोनाली तावडे या दाम्पत्याला अंकिता आणि शुभंकर ही दोन मुलं. दोन्हीही मुलं कालासृष्टीशी जोडली गेलेली आहेत.

ankita tawde pravin varak wedding
ankita tawde pravin varak wedding

शुभंकरने चित्रपटातून सहाय्यक ते प्रमुख नायकाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. बहिणीच्या लग्नात शुभंकर खूपच उत्सुक दिसत होता. लग्नाच्या एक दिवस अगोदर कलाकारांची मांदियाळी संगीत सोहळ्याला उपस्थित राहिली होती. वाजत गाजत धुमधडाक्यात हा संगीत सोहळा पार पडल्यानंतर त्यांच्या लग्नाचा थाट तर पाहण्याजोगा होता. अगदी राजेशाही थाटात म्हणावे असं सुनील तावडे यांनी आपल्या लेकीचं लग्न करून दिलं. त्यामुळे तावडे कुटुंबातील हे लग्न सेलिब्रिटी विश्वात खूप गाजलेलं पाहायला मिळालं. लग्नाची धामधूम आणि आठवणीतले अनेक क्षण त्यांनी शेअर केले आहेत. तर अंकिता आणि प्रवीण या नवविवाहित दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.