Breaking News
Home / मालिका / सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीला दुखापत.. चाहत्यांनी काळजी केली व्यक्त

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीला दुखापत.. चाहत्यांनी काळजी केली व्यक्त

​काही दिवसांपूर्वीच सुंदरा मनामध्ये भरली या कलर्स मराठीवरील मालिकेतील मुख्य नायिका म्हणजेच अक्षया नाईक हिच्या पायाला दुखापत झाली होती. अक्षयाला दुखापत झाल्यामुळे मालिके​​च्या कथानकात थोडासा बदल करण्यात आला होता​.​ मात्र ही दुखापत वाढू लागल्याने तिला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अक्षयाने काही दिवस या मालिकेतून ब्रेक घेतला. अशातच या मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने दुखापत झाल्याच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचे दिसून येते. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिनेत्री पूनम चौधरी पाटील यांनी लतीकाच्या आईची जयश्रीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेमुळे पूनम यांना चांगली​ लोकप्रियता मिळाली आहे.

actress poonam patil
actress poonam patil

अक्षया पाठोपाठ पूनम यांच्या हाताला देखील दुखापत झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एक ऍक्सिडंट घडला ज्यात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. नुकतेच त्यांच्या हाताला सर्जरी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत देखील त्यांनी मालिकेच्या सेटवर येऊन आपले शूटिंग पूर्ण केले. परंतु हे शूटिंग पूर्ण करून त्यांनी मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. काही दिवस घरी राहून विश्रांती केल्यानंतर पुन्हा त्या मालिकेत सक्रिय होणार आहेत. मालिकेच्या या दोन्ही मायलेकींना झालेली दुखापत पाहून प्रेक्षकांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे. दोघींनाही चाहत्यांनी तसेच मराठी सृष्टीतील कलाकारांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. पूनम चौधरी पाटील यांनी एकांकिका मधून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती.

sundara manamdhye bharali
sundara manamdhye bharali

राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धांमधून दिग्दर्शन तसेच निर्मितीची धुरा त्यांनी सांभाळली आहे. अशातच त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. मुक्ता बर्वे आणि स्मिता पाटील या माझ्या प्रेरणास्थान आहेत असे त्या म्हणतात. काळी माती, कास, ट्रिपल सीट, तू अशी जवळी रहा, ग्रहण, यंग्राड, जाडुबाई जोरात, घुमा, चार दिवस प्रेमाचे अशा नाटक, चित्रपट तसेच मालिकांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाचा दांडगा अनुभव असलेल्या पूनम चव्हाण पाटील यांनी सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत जयश्रीची भूमिका साकारून प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्यांनी या मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. या दुखपतीतून लवकर बऱ्या होऊन त्या पुन्हा मालिकेत सक्रिय व्हाव्यात हीच एक सदिच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.