Breaking News
Home / मालिका / सासू सुनेचं प्रेम, जिवलग मैत्रिणींसारखं सेम.. अभिनेत्रीचे मराठी मालिकेत नव्याने पदार्पण
sanchitaa kulkarni sukanya mone
sanchitaa kulkarni sukanya mone

सासू सुनेचं प्रेम, जिवलग मैत्रिणींसारखं सेम.. अभिनेत्रीचे मराठी मालिकेत नव्याने पदार्पण

मराठी सृष्टीत नाव कमावणाऱ्या बऱ्याचशा अभिनेत्री हिंदी मालिका सृष्टीत देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. अशातच हिंदी सृष्टीत सहाय्यक भूमिकेत झळकण्याची नामी संधी मिळालेली अभिनेत्री आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठी मालिका सृष्टीत पुनःपदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. येत्या १४ मार्च २०२२ पासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ८ वाजता ‘सुंदर आमचे घर’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या पदार्पणामुळे सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनी मराठीवर नव्याने दाखल होत असलेल्या ‘सुंदर आमचे घर’ या मालिकेत सुकन्या मोने, उषा नाडकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

sanchitaa kulkarni sukanya mone
sanchitaa kulkarni sukanya mone

मालिकेच्या प्रोमोमधून सासू सूनेचं प्रेम जिवलग मैत्रिणींसारखं सेम असे म्हणत या सासू सुना एकमेकांशी तितक्याच आपुलकीने वागताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही एक कौटुंबिक मालिका असल्याचे दिसून येते. मालिकेत आणखी एक खास बाब म्हणजे अभिनेत्री संचिता कुलकर्णी या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठीवरील जाडुबाई जोरात या मालिकेतून संचिताने अभिनय साकारला होता. बंध रेशमाचे, अरुंधती अशा मालिकेतून सहाय्यक भूमिका तसेच प्रीती परी तुजवरी , श्रावणबाळ रॉकस्टार या मालिकेतून संचिता मुख्य भूमिकेत दिसली होती. मराठी मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याअगोदर संचिता हिंदी सृष्टीतही झळकली. चिडीया घर, प्यार की एक कहानी या मालिकेतून तिला सहाय्यक भूमिका मिळाली होती.

actress sanchitaa kulkarni
actress sanchitaa kulkarni

जाडूबाई जोरात या मालिकेनंतर संचिता फारशी कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. त्यामुळे बऱ्याच प्रतीक्षेनंतर ती पुन्हा पदार्पण करण्यास सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. संचिता कुलकर्णी ही मूळची नागपूरची, शिक्षण पूर्ण केल्या नंतर काही काळ संचिता रेडिओ जॉकी म्हणून काम करत होती. अशातच तिला मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. सुंदर आमचे घर या नव्या मालिकेतून ती जवळपास ४ ते ५ वर्षानंतर छोट्या पडद्यावर झळकणार आहे. सुकन्या मोने आणि संचिता कुलकर्णी सासू सुनेच्या भूमिकेत झळकणार आहे. मालिकेतून आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहेत हे येत्या काही दिवसात उलगडेल. तूर्तास संचिता कुलकर्णी हिचे मराठी मालिकेत पुनः पदार्पणासाठी अभिनंदन.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.