Breaking News
Home / मालिका / गौरीने दिलं शालिनीला चॅलेंज.. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका रंजक वळणावर
sukh mhanje nakki kay asta gauri shalini
sukh mhanje nakki kay asta gauri shalini

गौरीने दिलं शालिनीला चॅलेंज.. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका रंजक वळणावर

​सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. शालिनी आणि देवकीला धडा शिकवणारी डॅशिंग गौरी प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. गौरी माईंजवळ जाऊन खऱ्या गौरीलाच गौरी असल्याचे नाटक करावे लागतंय, पण आपण यातून बाहेर पडू असे बोलून जाते. मात्र माईंच्या वेशात तिथे शालिनी झोपलेली अ​​सते हे गौरीला माहीत नसते. त्यामुळे गौरीचे सत्य आता शालिनीला समजले आहे. त्यामुळे ती सर्वांसमोर हीच गौरी आहे याचा खुलासा करते. आपलं सत्य बाहेर पडेल म्हणून गौरी आता नवीन युक्ती लढवताना दिसत आहे. गौरीनेच आता शालिनीला चॅलेंज देऊन मी खरी गौरी आहे हे सिद्ध करून दाखव असे म्हटले आहे.

sukh mhanje nakki kay asta gauri shalini
sukh mhanje nakki kay asta gauri shalini

गौरीचे हे चॅलेंज शालिनी स्वीकारते मात्र ती गौरी असल्याचा पुरावा कसा गोळा करणार हे प्रेक्षकांना पाहायला निश्चितच आवडणार आहे. या रंजक वळणामुळे मालिकेचा टीआरपी देखील वाढलेला पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. मालिकेत गौरीचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. गौरीने शालिनीला आणि देवकीला धडा शिकवला पाहिजे असे सुरुवातीपासूनच मालिकेच्या प्रेक्षकांना वाटत होते. प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होत असल्याने मालिकेचा घसरलेला टीआरपी ट्विस्टमुळे तिला दुसऱ्या क्रमांकावर नेऊन पोहोचवले आहे. मालिकेत देवकीची भूमिका अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिने निभावली आहे.

girija prabhu varasha usagaonkar madhavi nimkar
girija prabhu varasha usagaonkar madhavi nimkar

मिनाक्षी प्रेग्नंट असूनही या मालिकेत ती सक्रिय आहे. तिच्या या धाडसी निर्णयाचे महिला वर्गानेच नव्हे तर पुरुष मंडळींनी देखील तितकेच कौतुक केले आहे. मिनाक्षीने साकारलेली देवकी विरोधी जरी असली तरी तिच्या कुरघोडी स्वभावामुळे मालिका पहावी वाटते असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. तिने मालिका सोडू नये आणि प्रेग्नन्सीमुळे तिने जर मालिका सोडली तर मालिका पाहावीशी वाटणार नाही असेही अनेकांचे म्हणणे आहे. परंतु बाळाच्या जन्मानंतर काही महिने तरी देवकीच्या पात्राला आपण मिस करणार आहोत हे प्रेक्षक जाणून आहेत. तूर्तास मालिकेत शालिनीला गौरीकडून मिळालेले चॅलेंज ती पूर्ण करणार का हे पाहावे लागेल. यानंतर मालिकेत आणखी काय घडते याचीही उत्सुकता आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.