७२ मैल एक प्रवास या चित्रपटातील राधाक्का आठवतेय का.. ही प्रसिद्ध भूमिका लीलया निभावणारी मराठमोळी स्मिता तांबे हि मराठी आणि हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. स्मिताने बाणेदार अभिनयाने रसिकांवर छाप पाडली आहे. स्मिताचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये ११ मे १९८३ रोजी झाला असून, बालपण पुण्यात गेले. स्मिताचे शालेय शिक्षण मॉडर्न हायस्कुल, निगडी येथे झाले. आकुर्डीतील म्हाळसाकांत कॉलेजमध्ये तिने अभिनयाचे प्राथमिक धडे गिरवले. जानेवारी २०१९ मध्ये अभिनेत्री स्मिताचे नाट्यकलाकार वीरेंद्र द्विदेवी सोबत लग्न झाले होते.. चित्रपट सृष्टीत संधी शोधण्यासाठी मुंबईत स्थायिक झाली. तिने मराठी लोकसाहित्यामध्ये पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
तुकाराम, जोगवा, अनुबंध, लाडाची लेक गं या मालिका, ७२ मैल एक प्रवास, परत, गणवेश हे चित्रपट आणि ‘हमिदाबाईची कोठी’ या नाटकातून तिने आपल्या अभिनयचा उच्चांक गाठला. मराठी सोबतच स्मिताने हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनायचा ठसा उमटवला आहे. याच बरोबर ती नूर, डबल गेम, सिंघम रिर्टन, रुख, या बॉलिवूड चित्रपटांमध्येही अभिनय करण्याची संधी मिळाली.. सॅक्रेड गेम्सच्या २ ऱ्या सीझनमध्ये आणि माय नेम इज शीला या दोन वेबसीरिजमध्ये तिने प्रभावी भूमिका केल्या आहेत. अक्षय कुमारची निर्मिती असलेल्या ७२ मैल एक प्रवास हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष भावला, तिने रंगवलेली राधाक्का चे सादरीकरण आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरलेले आहे.
नुकताच स्मिताचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला, त्याचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. या खास प्रसंगी तिच्या मैत्रिणींनी मिळून स्मिताला फुलांच्या माळांनी सजवले होते, चित्रपटातील डोहाळे गाणी म्हणत स्मिता भोवती फेर धरला. कुणीतरी येणार येणार गं या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित गाण्यावर सगळ्या जणींनी ठेका धरला. शिवाय स्मिताचे पति वीरेंद्र यांनीही या सोहळ्यात छानसे नृत्य केले.. आज स्मिता आणि धीरेंद्र यांना कन्यारत्न प्राप्त झाले असून मित्र परिवारात आनंदोत्सव साजरा होत आहे. दोघांनाही शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे. स्मिता तांबे चित्रपट निर्माती आहे हे खूप कमी जणांना माहित आहे. ‘रिंगिंग रेन’ हे तिची फिल्म प्रॉडक्शन कंपनी आहे. तिने ‘सावट’ या चित्रपटाती निर्मिती केली होती, यात तिने ए.सी.पी. आदिती देशपांडेची भूमिका साकारली. अशा या हरहुन्नरी कलाकार जोडप्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.