Breaking News
Home / मराठी तडका / फुलाला सुगंध मातीचा लोकप्रिय मालिकेतील कलाकाराची लगीनघाई..

फुलाला सुगंध मातीचा लोकप्रिय मालिकेतील कलाकाराची लगीनघाई..

मराठी सृष्टीत सध्या कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. स्टार प्रवाह वरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील पश्या म्हणजेच आकाश नलावडे याचेही लवकरच लग्न होणार आहे. त्याच्या लग्नाची खरेदी झाली असून केळवण देखील साजरं केलं जात आहे. तर फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेच्या शोर्षक गीताची गायिका म्हणजेच कीर्ती किल्लेदार हिची देखील लगीनघाई सुरू झालेली आहे. या फुलाला सुगंध मातीचा हे शीर्षक गीत कीर्ती किल्लेदार आणि अनिरुद्ध जोशी यांनी स्वरबद्ध केलं होतं. या गाण्याला प्रेक्षकांकडून मोठी प्रसिद्धी मिळाली होती. कीर्ती किल्लेदार ही गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीशी जोडलेली आहे.

kirti killedar
kirti killedar

दुनियादारी चित्रपटातील तिने देवा तुझ्या गाभाऱ्याला हे गाणं गायलं होतं. तर तानाजी बॉलिवूड चित्रपटातील हे माय भवानी हे गाणं तिने स्वरबद्ध केलेलं आहे. किर्तीने आजवर चित्रपट, मालिका शीर्षक गीत तसेच अल्बमसाठी गाणी गायली आहेत. सोबतच विविध मंचावर तिने गाणी गायली आहेत. त्यामुळे कीर्ती किल्लेदार हे नाव प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक झाले आहे. प्रेक्षकांची ही आवडती गायिका लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून कीर्तीच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली आहे. आज सकाळीच तिच्या मेहेंदीचा सोहळा पार पडला असून उद्या हळद आणि संगीत सोहळा पार पडणार आहे. डिसेंबर महिन्यात किर्तीची बहीण अंतरा कील्लेदार विवाहबंधनात अडकली होती. तिच्या पाठोपाठ साधारण तीन महिन्यांनी कीर्ती स्वतःच्या लग्नाची जोरदार तयारी करताना दिसत आहे.

kirti killedar parents
kirti killedar parents

गेल्या महिन्यात किर्तीने व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी आपल्या बॉयफ्रेंड सोबतचा फोटो शेअर करून प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली होती. त्यावेळी अनेकांनी कीर्तीचे अभिनंदन केले होते. कीर्तीचा बॉयफ्रेंड म्हणजेच मंथन त्रिवेदी सोबत ती आता लग्न करत आहे. आज त्यांच्या मेहेंदीचा सोहळा थाटात पार पडला यावेळी जवळच्या  नातेवाईकांनी सोहळ्याला हजेरी लावली होती. कीर्ती आणि मंथन हे दोघेही पुण्यातच वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनची त्यांची मैत्री आता नात्याच्या बंधनात अडकणार आहे. त्यामुळे मराठी सेलिब्रिटींनी किर्तीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसात पार पडणाऱ्या तिच्या लग्नाचा थाट कसा असेल याची तिचे चाहते वाट पाहत आहेत.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.