Breaking News
Home / जरा हटके / शिंदेशाही घराण्याचा जागतिक विक्रम..
adarsha utkarsh aalhad shinde

शिंदेशाही घराण्याचा जागतिक विक्रम..

लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे कुटुंबाने महाराष्ट्रातच नाही तर सबंध देशभरात आपल्या गाण्यांचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. भक्तिगीत, कोळीगीत, भीम गीत, कव्वाली, लोकगीत गायनात आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. प्रल्हाद शिंदे यांचा लोकसंगीताचा वारसा जिवंत ठेवून आजच्या पिढीलाही त्यांनी लोकसंगीतावर ताल धरायला भाग पाडले आहे. त्यांचा संगीताचा हाच वारसा आनंद शिंदे आणि त्यांची नातवंड पुढे चालवताना दिसत आहेत. आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक होते तर त्यांची आज्जी सोनाबाई या तबलावादक होत्या.

adarsha utkarsh aalhad shinde
adarsha utkarsh aalhad shinde

सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी देखील संगीत क्षेत्राची सेवा केली. आनंद शिंदे यांनी गायलेली गाणी केवळ मराठी सृष्टीतच नाही तर बॉलिवूड जगताला देखील थिरकायला लावणारी आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलांनी देखील संगीत क्षेत्रात उंचच उंच भरारी घेतली. शिंदेशाहीचा डंका आता जगभरात मिरवला जात आहे. त्याला कारणही तितकेच खास आहे. नुकतेच शिंदेशाही कुटुंबाचे नाव वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत विराजमान झाले आहे. २३ जून २०२२ रोजी वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी तर्फे शिंदे कुटुंबाला ‘मोस्ट रेकॉरडेड आर्टिस्ट इन फॅमिली’ हे मानांन प्राप्त झाले आहे. त्यामुळे शिंदेशाही कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव झालेला पाहायला मिळतो आहे.

shindeshahi world record
shindeshahi world record

या संदर्भात नुकतेच उत्कर्ष शिंदे याने आभार व्यक्त केले आहेत. तो म्हणतो, २३ जून २०२२ म्हणजे माझे आजोबा स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे ह्यांची २८वी पुण्यतिथी. आणि कालच जागतिक दर्जाचे वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी तर्फे शिंदेशाही परिवाराचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड यादीत विराज मान झाले. कालच्या दिनी हि सर्वात मोठी आदरांजली मी मानतो. शिंदेशाही परिवाराला हे मिळालेले यश हे फक्त तुम्हा रसिकजनामुळे. आमच्या सोबत काम करणाऱ्या एकूण एक कलाकारामुळे, आमच्या वर नितांत प्रेम करणाऱ्या सर्वांचे आहे असे आम्ही मानतो. आम्हाला मिळालेले हे वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचा मान सन्मान मी सर्व महापुरुषांच्या चरणी अर्पण करतो. आपण होतात आपण लढलात म्हणून आम्ही घडलो.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.