Breaking News
Home / जरा हटके / बाप्पा त्या चोराला आशीर्वाद देवो.. गणोशोत्सवाच्या गर्दीत अभिनेत्रीचा मोबाईल गेला चोरीला
sharayu sonwane pinkicha vijay aso
sharayu sonwane pinkicha vijay aso

बाप्पा त्या चोराला आशीर्वाद देवो.. गणोशोत्सवाच्या गर्दीत अभिनेत्रीचा मोबाईल गेला चोरीला

दहीहंडी, गणोशोत्सव या सणांना अधिक झगमगाट येण्यासाठी विविध मंडळ, राजकारणी लोकं मराठी तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करत असतात. या मोठमोठाल्या सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यासाठी मंडळांची आणि राजकारण्यांची जणू काही एक स्पर्धाच चालू असते. सध्या स्टार प्रवाहवरील मालिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळू लागली आहे. त्यामुळे हे स्टार प्रवाहवरील सेलिब्रिटी तेवढ्याच जोमाने दिलेली आमंत्रणं स्वीकारताना पाहायला मिळाली आहेत. मात्र या धामधुमीत सेलिब्रिटी आपला मोबाईलच गमावत आहेत. नुकतेच पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकी म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनवणे हिला देखील असाच काहीसा अनुभव आला आहे.

sharayu sonwane pinkicha vijay aso
sharayu sonawane pinkicha vijay aso

पिंकीचा विजय असो मालिकेत विजय आंदळकर आणि शरयू सोनवणे यांना विविध ठिकाणी आमंत्रण दिले होते. मालिकेची लोकप्रियता पाहता या कलाकारांना या आमंत्रणामधून चांगले मानधन देखील मिळते. शरयुने काही दिवसांपूर्वीच तळेगाव येथील दहीहंडी उत्सवात हजेरी लावली होती. त्यानंतर शरयू पुन्हा मालिकेत सक्रिय झाली. स्टार प्रवाहच्या गणेशोत्सव कार्यक्रमात देखील तिने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. मात्र या सर्व गडबडीत शरयूचा मोबाईल चोरीला गेला असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून मी माझ्या सोशल अकाउंटवरून कोणाशीच संपर्क साधू शकत नाही असे तिने म्हटले आहे. शरयुने इंस्टा स्टोरीवरून मोबाईल चोरी झाल्याची बाब समोर आणली आहे. आठवड्यापासून चाहत्यांशी कुठलाच संवाद होऊ शकत नसल्याने तिने ही खंत व्यक्त केली आहे.

sharayu sonawane
sharayu sonawane

‘बाप्पा त्या चोराला आशीर्वाद देवो’ अशी एक दिलखुलास ईच्छा तिने यातून व्यक्त केली आहे. शरयू सोनवणे हिने पिंकीचा विजय असो या मालिकेअगोदर कोठारे व्हिजन प्रस्तुत प्रेम पोईजन पंगा या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. महेश कोठारे यांनी शरयुला अभिनयाची मोठी संधी मिळवून दिली होती. पिंकीचा विजय असो मालिकेत शरयूचा डॅशिंग अंदाज आणि बिनधास्तपणा तिने तिच्या अभिनयाने चांगलाच साकारलेला पाहायला मिळतो आहे. त्याचमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. शरयूची ही दुसरीच मालिका असली तरी तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आणि म्हणूनच शरयूचा चोरी झालेला मोबाईल तिला लवकरात लवकर मिळो आहि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.