Breaking News
Home / मराठी तडका / या प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रिवेडिंग फोटोशूट… लवकरच करणार लग्न
actress siddhi patne prewedding photoshoot
actress siddhi patne prewedding photoshoot

या प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रिवेडिंग फोटोशूट… लवकरच करणार लग्न

स्टार प्रवाहवर सांग तू आहेस का ही मालिका प्रसारित होत होती. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका लोकप्रिय ठरल्याने त्यातील कलाकार प्रेक्षकांना आजही चांगलेच आवडीचे आहेत. या मालिकेतील अभिनेत्री आता लवकरच विवाहबद्ध होणार आहे. नुकतेच तिने प्रिवेडिंग फोटोशूट करून घेतलेले पाहायला मिळत आहेत. ही अभिनेत्री आहे “सिद्धी पाटणे”. मालिकेत अभिनेत्री सिद्धी पाटणे हिने शांभवीची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सिद्धी पाटणे हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी तिचा होणारा नवरा विशाल दलाल यानेही हजेरी लावून सिद्धीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

actress siddhi patne prewedding photoshoot
actress siddhi patne prewedding photoshoot

वाढदिवस आणि लग्न ठरल्याचे असे दोन्ही क्षण यावेळी तिने साजरे केले होते. विशाल दलाल हा बदलापूरचा असून आर्किटेक्ट आहे. सध्या स्टुडिओ आर्कि-कल्चर येथे तो प्रोजेक्ट आर्किटेक्ट म्हणून कार्यरत आहे. अभिनेत्री सिद्धी पाटणे ही मूळची खेड, रत्नागिरीची. इथेच तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे मुंबई युनिव्हर्सिटीमधून तिने एमबीएचे शिक्षण घेतले. मालिका चित्रपटातून काम करत असताना तिला एका व्हिडीओ अल्बममध्ये झळकण्याची नामी संधी मिळाली. “गोव्याच्या किनाऱ्यावर…” या गाजलेल्या गाण्यामुळे सिद्धीला तुफान लोकप्रियता मिळाली होती. सुहृद वर्डेकर आणि सिद्धी पाटणे यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. हे दोन्ही कलाकार या गाण्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. या गाण्यासोबतच सिद्धी आणि सुहृद आणखी काही गाण्यातून एकत्रित झळकले आहेत.

actress siddhi patne
actress siddhi patne

सिद्धीने मालिका आणि चित्रपटातूनही काम केले आहे. प्रेमा तुझा रंग कसा, विठू माऊली, श्री गुरुदेवदत्त, सांग तू आहेस का अशा वेगवेगळ्या मालिकांमधून तिने अभिनय साकारला आहे. श्री गुरुदेव दत्त या मालिकेत सिद्धीला पार्वतीची आव्हानात्मक भूमिका साकारण्याची नामी संधी मिळाली होती ही भूमिका तिने अतिशय सुरेख बजावली होती. सांग तू आहेस का या स्टार प्रवाहवरील मालिकेतून ती शांभवीच्या भूमिकेत झळकली. शिवाय मधल्या काळात काही ज्वेलरीसाठी तिने मॉडेलिंग देखील केले आहे. आता लवकरच सिद्धी पाटणे दलाल घराण्याची सून होणार आहे. मात्र ती लग्न कधी करणार याची उत्सुकता आता तिच्या चाहत्यांना लागून राहणार हे नक्की. कारण नुकतेच तिचे प्रिवेडिंग फोटोशूट प्रसिद्धी मिळवत आहे आणि चाहत्यांकडून तिला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

siddhi patne shambhavi
siddhi patne shambhavi

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.