Breaking News
Home / जरा हटके / मराठी सृष्टीतील देखण्या अभिनेत्याची एगेजमेंट.. या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लवकरच करणार लग्न
sanket pathak engagement
sanket pathak engagement

मराठी सृष्टीतील देखण्या अभिनेत्याची एगेजमेंट.. या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लवकरच करणार लग्न

मराठी सेलिब्रिटी विश्वात लग्नसोहळ्याचे वारे वाहत आहेत. या गर्दीत आता मराठीतील हँडसम अभिनेत्याने गुपचूप एंगेजमेंट सोहळा उरकला आहे. स्टार प्रवाहवरील लग्नाची बेडी या मालिकेतील राघव रत्नपारखी म्हणजेच अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम यांनी गुपचूप एंगेजमेंट केली आहे. आणि मी हो म्हटलं, आमचा एकत्र प्रवास सुरु झाला. कुठे, कधी, कसं इत्यादी इत्यादी, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं लगेच देऊ. असे म्हणत या दोघांनी रिंग घातलेला एक क्युट फोटो शेअर केला आहे. या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल अनेकांना माहीत होतं.

sanket pathak engagement
sanket pathak engagement

आज त्यांनी ही बातमी अधिकृतपणे जाहीर करताच मराठी सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सुपर्णा श्याम आणि संकेत पाठक या दोघांनीदोन वेळा मालिकेतून एकत्रितपणे काम केले आहे. दुहेरी या मालिकेत सुपर्णाने प्रमुख भूमिका साकारली, तर संकेतने या मालिकेत विक्रमची भूमिका निभावली होती. विक्रमची बालपणीची मैत्रीण निलमची भूमिका साकारताना संकेत सोबत तिची छान मैत्री झाली. छत्रीवाली या मालिकेतून सुपर्णाला पुन्हा एकदा संकेत सोबत स्क्रीन शेअर केली. मालिकेमुळे दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. एकत्र पार्टी करणे, फिरणे चालू असल्याने या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे अशी चर्चा पाहायला मिळाली. पाच महिन्यांपूर्वी या दोघे एकत्रित बीच वर पाहायला मिळाल्याने, डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

sanket pathak suparna shyam engagement
sanket pathak suparna shyam engagement

संकेत पाठक हा मराठी सृष्टीतील देखणा अभिनेता म्हणून ओळखला जातो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तो स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी मुंबईला आला. अल्पावधीतच मालिका चित्रपटातून नायक बनून प्रेक्षकांची पसंती मिळवू लागला. ईटीव्ही मराठीवर जय हो या मालिकेमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली. कलर्स मराठी वाहिनीवर माझा होशील का मालिकेत तो समर भागवत नावाच्या श्रीमंत व्यक्तीची भूमिका साकारली. दुहेरी, लग्नाची बेडी, छत्रीवाली, प्रीत का दामन, मेरी निगाहें यासह अनेक हिंदी मराठी भाषिक मालिकांमधून तो प्रसिद्धीस आला. सुपर्णा श्याम आणि संकेत पाठक या दोघांच्या चाहत्यांना त्यांना लवकरच लग्नाच्या बेडीत अडकताना पाहायचं आहे. त्यामुळे त्यांची लग्नघटिका कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.