Breaking News
Home / मराठी तडका / संकर्षण कऱ्हाडे साठी वर्षाचा शेवट ठरला लखलाभ… हे आहे कारण

संकर्षण कऱ्हाडे साठी वर्षाचा शेवट ठरला लखलाभ… हे आहे कारण

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील समीरच्या भूमिकेने संकर्षण कऱ्हाडेला अमाप लोकप्रियता मिळाली आहे. तू म्हणशील तसं या नाटकाच्या दौऱ्यामुळे तो मालिकेत कमी दिसणार या जाणिवेनेच प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. मालिकेतला त्याने निभावलेला समीर प्रेक्षकांना हवाहवासा वाटतो हीच भावना अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र नाटक आणि मालिका ह्या व्यस्त शेड्युल मधूनही तो पुन्हा मालिकेत सक्रिय होतोय हे समजल्यावर प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

sankarshan karhade surprising year ending
sankarshan karhade surprising year ending

अर्थात आता संकर्षण लवकरच आणखी एक जबाबदारी देखील सांभाळताना दिसणार आहे. झी मराठी वाहिनीवर प्रशांत दामले यांनी आम्ही सारे खवय्ये या कुकरी मालिकेची धुरा समर्थपणे सांभाळली होती त्यानंतर ही जबाबदारी राणी गुणाजी, मृणाल दिसाणीस आणि त्यांनतर संकर्षण कऱ्हाडेकडे देण्यात आली. काही वर्षे या शोमध्ये संकर्षण तग धरून होता परंतु मागील काळात मालिकेचे चित्रीकरण होण्यास अडचणी येऊ लागल्या त्यामुळे २००७ सालापासून सुरू झालेला इतक्या वर्षांचा आम्ही सारे खवय्येचा हा प्रवास नाईलाजाने अर्ध्यावरच सोडावा लागला. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा नव्या रुपात कुकरी शो सुरू करण्याचा निर्णय झी वाहिनीने घेतलेला पाहायला मिळतो. ‘आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार, मनोरंजनाची चव वाढणार’… असं म्हणत संकर्षण कऱ्हाडे “किचन कल्लाकार” या नव्या कुकरी शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. नुकतीच या मालिकेची एक झलक प्रेक्षकांसमोर आली आहे आणि या शोचे प्रेक्षकांनी देखील स्वागत केलेले पाहायला मिळत आहे.

actor sankarshan karhade
actor sankarshan karhade

त्यामुळे संकर्षण कऱ्हाडे आता झी वाहिनीवर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी संकर्षणला जुळी अपत्ये झाली एकाच वेळी मुलगी आणि मुलगा झाल्याचे जगातील सर्वांत सुंदर सुख. तर दुसऱ्या बाजूला तीन पुरस्कारा नंतर तू म्हणशील तसं हे नाटक. तसेच माझी तुझी रेशीमगाठ आणि आता किचन कल्लाकार या मालिकेमुळे मिळत आलेल्या संधी आयुष्याचं सोनं करून गेल्या आहेत. त्यामुळे संकर्षण कऱ्हाडेसाठी हे वर्ष लखलाभ ठरलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.