Breaking News
Home / मराठी तडका / माझ्यासोबत म्हतारं व्हायला आवडेल का.. खुशबू आणि संग्रामची भन्नाट लव्हस्टोरी
titeeksha tawde khushboo sangram
titeeksha tawde khushboo sangram

माझ्यासोबत म्हतारं व्हायला आवडेल का.. खुशबू आणि संग्रामची भन्नाट लव्हस्टोरी

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत विणाच्या एंट्रीने कथानकाला एक नवीन वळण मिळालं आहे. वीणा ही आशुतोषची बहीण आहे, पण अनिरुद्धच्या जाळ्यात खेचली जाणार का अशी शंका अरुंधतीच्या मनात घर करून आहे. विणाची भूमिका अभिनेत्री खुशबू तावडे हिने साकारली आहे. खुशबू तावडे आणि तीतीक्षा तावडे या दोघी बहिणींनी मराठी मालिका सृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे. सध्या या दोघी बहिणी मालिकांमधून सक्रिय झाल्या आहेत. मुलगा राघवच्या जन्मानंतर खुशबूने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. आज खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांची लव्हस्टोरी कशी घडली याबद्दल जाणून घेऊयात.

titeeksha tawde khushboo sangram
titeeksha tawde khushboo sangram

तुमच्यासाठी कायपण हा संग्राम साळवीचा देवयानी मालिकेतला डायलॉग खूपच लोकप्रिय झाला होता. या मालिकेत तो प्रमुख भूमिका साकारत होता. या मालिकेत खुशबू तावडेची एन्ट्री झाली होती त्यावेळी संग्राम खूशबुच्या प्रेमातच पडला होता. पण जाहीरपणे कबुली देण्यासाठी त्याने थोडासा वेळ घेतला. संग्राम हा खूप ऍटीट्युड दाखवतो असा समज त्यावेळी खुशबूने करून घेतला होता. त्यामुळे खुशबू त्याच्याशी फारशी बोलत नव्हती. एक दिवस मालिकेचा मेकअप आर्टिस्ट खुशबुला भाभी म्हणून हाक मारताना दिसला. त्यामुळे तिला संग्रामबद्दल शंका आली होती. पण त्यानंतर मालिकेचा ट्रॅक बदलल्याने खुशबू या मालिकेतून बाहेर पडली. तेव्हा मेकअप आर्टिस्टच्या मदतीने संग्रामने खुशबुचा मोबाईल नंबर मिळवला.

khushboo tawde sangram salvi son raghav
khushboo tawde sangram salvi son raghav

संग्रामने तिला कॅफेमध्ये भेटण्यासाठी बोलावले. खुशबू आणि संग्राम कॅफेमध्ये बसले असताना त्याने लग्न करणार का असे न विचारता, माझ्यासोबत म्हतारं व्हायला आवडेल का? अशा हटके अंदाजात त्याने खुशबूला प्रपोज केले होते. खुशबुला संग्रामचा प्रपोज करण्याचा हा अंदाज आवडला आणि तिने लगेचच आपला होकार कळवला. त्यानंतर २०१८ साली मोठ्या थाटात या दोघांनी लग्नही केले. राघव हा त्यांचा एकुलता एक मुलगा. राघवच्या जन्मानंतर खुशबू काही काळासाठी अभिनय क्षेत्रापासून बाजूला होती. पण यादरम्यान ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहत होती. अशातच नवनवीन रेसिपीजचे व्हिडीओ ती शेअर करू लागली. त्यानंतर आता ती आई कुठे काय करते मालिकेतून विणाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.