Breaking News
Home / बॉलिवूड / कतरिना, सलमान आणि जॉनचे बोलणे झाले होते बंद, कारण ऐकून विश्वास नाही बसणार….
salman john katrina clashes
salman john katrina clashes

कतरिना, सलमान आणि जॉनचे बोलणे झाले होते बंद, कारण ऐकून विश्वास नाही बसणार….

बॉलिवूडमध्ये सुपरस्टार सलमान खानची चर्चा सतत सुरू असते, काही ना काही कारणाने तो प्रत्येक वेळी लोकांच्या नजरेत येत राहतो. त्याचे सर्व चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात, लोक त्याचे भरपूर दिवाने आहेत. त्याचे अनेक चित्रपट भरपूर गाजले आहेत, Being Human या संस्थेच्या मार्फत सलमान नेहमी सर्वांना मदत करत असतो. बॉलिवूड मधील अनेक गरजूंना त्याने मदत केली आहे तसेच बॉलीवूड बाहेरील लोकांना सुद्धा त्याने मदत केली आहे. पूर्ण जगभर त्याची चर्चा असते. एक सुपरस्टार म्हणून नाही तर गरजू लोकांसाठी तो फरिश्ता ठरला आहे.

सलमानच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्याच्या चाहत्यांना माहीत असतात, असेही म्हणतात की सलमानचे जर कोणाशी भांडण वगैरे झाले तर तो त्या व्यक्तीशी पुन्हा कधीच बोलत नाही. आजवर त्याचे चित्रपटसृष्टीत अनेक जणांशी भांडण झाले आहे. आज जॉन आणि सलमान कितीतरी काळ लोटला असूनही एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत. रवी चोप्रा दिग्दर्शित ‘बाबूल’ चित्रपटाचे शूटिंग सुरु होते तेव्हाचा हा किस्सा आहे, सलमान खान आणि जॉन अब्राहिम यांच्यात भांडण झाले होते. चित्रपटात सुपरस्टार अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी, हेमा मालिनी अशी भरभक्कम कलाकारांची टीम होती, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वेळी जॉन आणि सलमान खूप चांगले मित्र बनले होते. दोघांमध्ये एक घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झाले होते, बॉलिवूड पार्टी आणि चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे दोघेही सतत एकत्र फिरताना दिसत होते. त्यांच्या मैत्रीची प्रसार माध्यमांमध्ये जोरदार चर्चा असायची.

salman khaan
salman khaan

सलमानने जॉनला रॉकस्टार हा शो देखील ऑफर केला होता, हा शो एक इंटरनॅशनल टूर कॉन्सर्ट प्रकारातील होता. सलमान देखील या कॉन्सर्ट मध्ये सहभागी होणार आहे याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होता. एरवी ज्या शो मध्ये सलमान असतो तो शो भरपूर हिट होतो, सलमानने सोबत जॉन अब्राहमला नेले होते. जॉनने त्या शो मध्ये खूपच छान परफॉर्मन्स दाखवला,लोकांचे अप्रतिम मनोरंजन झाले. तिथे असणाऱ्या प्रत्येकाने जॉनच्या कलेची स्तुती केली, शिवाय क्रू मेंबर्सने देखील जॉनचे विशेष कौतुक केले. या शोसाठी जॉनने भरपूर मानधन घेतले, या मानधनात थोडी कमी करण्यासाठी सलमानने जॉनला समजावले पण जॉन ऐकायला तयार नव्हता.

john abraham
john abraham

या कारणामुळे सलमान आणि जॉन मध्ये थोडीशी वादावादी झाली होती. झालेल्या या गोष्टींचा दोघांच्या मनात दुरावा तयार होऊ लागला, मैत्रीत फूट पडू लागली. अखेर बाबूल चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला पण बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. सलमान म्हणाला होता की चित्रपटाचा सेकंड हाफ चांगला नसल्याने चित्रपट हिट झाला नाही. बाबूलच्या फस्ट हाफ मध्ये सलमान होता तर सेकंड मध्ये जॉन होता. याही कारणावरून जॉन आणि सलमान मध्ये वादविवाद आणखीनच चिघळत होते. त्याच दरम्यान सलमान खानच्या आयुष्यात कतरिना कैफने एन्ट्री केली..

salman khan katrina kaif
salman khan katrina kaif

कतरिनाने जॉन सोबतचा एक चित्रपट साइन केला होता, पण काही कारणामुळे तीला त्यातून बाहेर काढले गेले. कतरिनाला चित्रपटातून बाहेर काढण्याचे कारण जॉन होता अशा प्रकारच्या रुमर्स फिल्म इंडस्ट्री मध्ये पसरल्या होत्या. जॉनने कतरिना सोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता अशाही बातम्या रिपोर्ट्स कडून देण्यात आल्या होत्या. याबाबत कतरिना आणि सलमान यांनीही या गोष्टींना पत्रकारांच्या प्रश्नांना तोंड दिले होते.. या घटनेनंतर जॉन आणि सलमान यांच्यात खूपच दुरावा निर्माण झाला आणि त्यानंतर ते कोणत्याच चित्रपटात किंवा रिअल लाईफ मध्ये कधीच एकत्र दिसून आले नाहीत. सलमान आणि जॉन हे दोघेही आज बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत. दोघांचेही चित्रपट भरपूर गाजलेले आहेत, अनेकजणांना या जोडीने पुन्हा एकत्र काम करावे असेही वाटते. भविष्यात हे दोघे पुन्हा एकत्र दिसतील की नाही हा प्रश्न कायम गुलदस्त्यातच राहील.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.