सैराट चित्रपटातील अप्रतिम दिग्दर्शन, गाणी आणि नवख्या कलाकारांचा सहज सुंदर अभिनय सर्वांना एका रात्रीत प्रसिद्धी देऊन गेला. मराठी चित्रपट सृष्टीतील सैराट हा पहिलाच चित्रपट होता ज्याने आतापर्यंत भली मोठी कमाई केली. अर्थात याचे सर्व श्रेय दिग्दर्शकाला जाते. चित्रीकरणात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सर्व लहानसहान गोष्टीकडे रसिकांचे लक्ष वेधले जाईल याची खात्री केली होती. सैराट प्रदर्शित होऊन जवळपास सहा वर्षे लोटली असूनही आजही लोक हा चित्रपट नव्याने पाहतात. चित्रपटातील नायक भूमिकेतील परशा म्हणून प्रसिद्ध झालेले आकाश ठोसर आणि नायिका आर्ची रिंकू राजगुरू यांचा अभिनय चित्रपटातील मुख्य आकर्षण ठरले.
आर्ची या नावानेच प्रसिद्ध असली तरी फिल्म इंडस्ट्रीत तीला रिंकू नावाने ओळखले जाते पण तीचे खरे नाव प्रेरणा महादेव राजगुरू असे आहे. रिंकूने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार पटकाविला. सैराटच्या घवघवीत यशानंतर रिंकूने अजिबात वळून पाहिले नाही. तीने कागर, मेकअप हे चित्रपट देखील केले पण ते सैराट इतके बॉक्स ऑफिसवर फारसे गाजले नाहीत. यानंतर तीने लारा दत्ता सोबत हंड्रेड या वेबसिरीज मध्ये कामही केले, यातील नेत्रा पाटीलची तीची भूमिका लोकप्रिय झाली. याशिवाय ती अनपोज्ड या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील हिंदी चित्रपटात सुद्धा दिसून आली. या चित्रपटातील पाच लघुपटांपैकी ती रॅट ए टॅट मध्ये तिला संधी मिळाली होती.
रिंकू पुन्हा एकदा नागराज मंजुळे दिग्दर्शित केलेल्या अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात झळकली. रिंकूने खूप कमी कालावधीत यशाचे शिखर गाठले आहे. सैराटमध्ये या चित्रपटात तीने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आणि कलेच्या क्षेत्रात करिअरची यशोगाथा सुरु ठेवली. सोशल मीडियावर सक्रिय असलेली रिंकू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. साडीतील सुंदर फोटो शेअर केल्याने चाहत्यांनी कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे. रिंकूची हि मोहून टाकणारी मराठमोळी साडीतील शैली प्रेक्षकांना खूपच भावली आहे. सफेद रंगाच्या सुंदर फुलांच्या रंगसंगतीत नेसलेल्या साडीत ती खूपच शोभून दिसत आहे. रिंकूला अशीच प्रसिद्धी मिळत जाओ आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत तीची गणना होवो हीच सदिच्छा.