Breaking News
Home / मराठी तडका / लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ आहेत अभिनेते.. गेल्या काही वर्षांपासून आहेत अभिनय क्षेत्रापासून दूर
ravindra berde ashok mama laxmikant berde
ravindra berde ashok mama laxmikant berde

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ आहेत अभिनेते.. गेल्या काही वर्षांपासून आहेत अभिनय क्षेत्रापासून दूर

मराठी सृष्टीचा एक काळ गाजवलेले लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे असंख्य चाहते आहेत. विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अभिनयाची गोडी त्यांना बालवयातच लागली होती. त्यांचे भाऊ रविंद्र बेर्डे हे उत्तम अभिनेते तर चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे हे देखील अभिनेते, दिग्दर्शक म्हणून या सृष्टीत चांगलेच ओळखले जातात. अभिनयाचे बाळकडू त्यांना दोन्ही भावांकडून मिळाले असे म्हणायला हरकत नाही. रविंद्र बेर्डे सध्या ७७ वर्षांचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून रविंद्र बेर्डे अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. सध्या ते आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य नातवंडांसोबत सुखाने घालवत आहेत. आज त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

ravindra berde ashok mama laxmikant berde
ravindra berde ashok mama laxmikant berde

वयाच्या विसाव्या वर्षी रविंद्र बेर्डे नभोवाणीशी जोडले गेले होते. आकाशवाणीच्या नभोनाट्यांचे दिग्दर्शन ते करत असत हा काळ होता १९६५ चा. इथूनच त्यांचा नाट्यसृष्टीशी संबंध जुळला. नभोवाणीत त्यांनी २४ वर्षे सेवा केली होती, त्यानंतर १९८७ साली त्यांना नाटकातून अभिनयाची संधी मिळाली. नाटकातून काम करत असताना रविंद्र बेर्डे यांना विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ३१ नाटकातून काम केले होते. यातूनच पुढे ते चित्रपटातून देखील महत्वाच्या भूमिका साकारू लागले. बेरकी नजर आणि खलनायकी ढंगाचा बाज असल्याने बऱ्याचदा ते विरोधी भूमिकेत दिसले. सोबतच विनोदी, सहाय्यक भूमिकांमुळे त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. ३०० हून अधिक मराठी चित्रपट आणि जवळपास ५ हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केले होते.

ravindra berde family
ravindra berde family

यासोबत दूरदर्शन वरील मालिका, जाहिरातीतूनही झळकले. अष्टरूप जय वैभवलक्ष्मी माता, होऊन जाउदे, हमाल दे धमाल, थरथराट, चंगु मंगु, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा अशा चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ ते अगदी भरत जाधव यांच्यासोबत काम केले. १९९५ सालच्या दरम्यान व्यक्ती आणि वल्ली नाटकावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन गेला. त्यानंतर २०११ सालापासून कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते. कलेशी एकरूप झाल्याने मी या संकटांवर मात करत आलो असे रविंद्र बेर्डे आपल्या प्रकृतीबाबत म्हणतात. नाटकाची आवड त्यांना अजूनही स्वस्थ बसू देत नाही. संगीत देवबाभळी हे नाटक त्यांनी जवळपास चार वेळा पाहिलं. नाटकातील कलाकारांचे काम उत्तम झाले अशी पोचपावती देखील ते नाटक पाहिल्यानंतर देत असतात.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.