Breaking News
Home / मराठी तडका / बिग बॉसच्या आवाजामागचा खरा चेहरा आला समोर..
big boss marathi ratnakar tardalkar
big boss marathi ratnakar tardalkar

बिग बॉसच्या आवाजामागचा खरा चेहरा आला समोर..

मराठी बिग बॉसच्या घरात बिग बॉसचा चेहरा कोणाचा आहे? असा प्रश्न या शोच्या चाहत्यांना नेहमीच सतावत होता. आता हा गूढ चेहरा प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे. पडद्यामागच्या बिग बॉसचे नाव आहे रत्नाकर तारदाळकर. रत्नाकर तारदाळकर हे व्हॉइस आर्टिस्ट आहेत. मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिजनसाठी त्यांनी ऑडिशन दिली होती. आयोजकांना त्यांचा आवाज युनिक वाटला आणि बिग बॉससाठी रत्नाकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. रत्नाकर तारदाळकर हे पार्ल्याचे रहिवासी. पार्ले टिळक विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी डहाणूकर कॉलेजमधून एम कॉम केले.

big boss marathi ratnakar tardalkar
big boss marathi ratnakar tardalkar

पुढे पत्रकारितेची पदवी देखील त्यांनी प्राप्त केली. मराठी बिग बॉससाठी त्यांची निवड झाल्यावर रत्नाकर यांना आपली ओळख लपवावी लागली. कारण हा चेहरा पडद्यामागे असल्याने त्याबाबत गोपनीयता ठेवणे तितकेच महत्वाचे होते. यातूनही अनेकांना त्यांच्या आवाजामुळे तेच खरे बिग बॉस असावेत अशी शंका येऊ लागली. ही ओळख लपवता लपवता त्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. अर्थात बिग बॉसचे काम तेवढेच कठीण असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. बिग बॉसच्या घरात भांडणं झाली, वाद विवाद झाले की रात्री अपरात्री कधीही त्यांना घरातील सदस्यांना हाताळावे लागायचे, त्यांना सूचित करावे लागायचे. त्यामुळे कधी कधी झोपही पूर्ण होणे कठीण झाले होते.

ratnakar tardalkar
ratnakar tardalkar

रत्नाकर पार्ल्याला राहायचे तिथून सेटवर त्यांना लोणावळ्याला बोलावले जायचे. त्यामुळे ह्या प्रवासात त्यांचे खूपच हाल व्हायचे. मात्र आता हा शो फिल्मसिटीमध्येच होत असल्याने त्यांना ते सोयीस्कर झाले आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनमध्ये शिवानी सुर्वे हिने गोंधळ घातला होता. त्यावेळी रत्नाकर यांना रात्रीच लोणावळ्याला यावे लागले होते. एखाद्या कठीण प्रसंगात आपल्या आवाजामुळे आपुलकी वाटावी, सदस्यांना समजावता यावे म्हणून त्यांनी अनेक बारकावे शिकून घेतले. या कामात त्यांना वेळोवेळी त्यांच्या सहकाऱ्यांची देखील मोठी मदत मिळते. बिगबॉस हा बिग बॉसच्या घराचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ह्या घरात जे कोणी सदस्य येतील त्यांना पाहुण्यांसारखे वागवावे लागते.

त्यांचे स्वागत करून त्यांना या घरात आपुलकी वाटावी यासाठी आवाजात आत्मीयता यावी लागते. माझा आवाज यासाठी योग्य वाटला आणि म्हणूनच माझी या भूमिकेसाठी निवड करण्यात आली असे रत्नाकर तारदाळकर म्हणतात. अर्थात ही ओळख लपून राहिली नसल्याने आता आज काय घडलं म्हणून त्यांना अनेकांचे फोन येत असतात. आयोजकांनी हे सर्व गुप्त ठेवण्याची ताकीद त्यांना दिली आहे. बिग बॉसच्या मागचा खरा चेहरा समोर आला असला तरी त्यांना या घरातील बाबी उघड करता येणार नाहीत हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.