Breaking News
Home / जरा हटके / मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा..
marathi actress rashmi patil wedding
marathi actress rashmi patil wedding

मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा..

मराठी सेलिब्रिटी विश्वात लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून टीव्ही मालिका क्षेत्रातील कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी प्रतिशिर्डी पुणे येथे अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम ह्यांनी लग्नगाठ बांधली. कलाकारांनी ह्यांच्या लग्नात आवर्जून हजेरी लावली होती. तर शाल्व किंजवडेकर याने साखरपुडा करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शाल्व सोबत आणखी काही कलाकारांनी साखरपुडा करून आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे. अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी पाटील हिने देखील आपल्या आयुष्यातील खऱ्या जोडीदाराची निवड केलेली आहे.

marathi actress rashmi patil wedding
marathi actress rashmi patil wedding

रश्मी पाटील ही मराठी मालिका अभिनेत्री तसेच मॉडेल आहे. झी मराठीवरील कारभारी लयभरी या मालिकेत तिने शोना मॅडमची भूमिका साकारली होती. २१ एप्रिल २०२३ रोजी पुण्यातील महाराजा रेस्टोरंट मध्ये रश्मी पाटीलने अक्षय सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला होता. त्यानंतर आता आज २१ मे रोजी हे दोघेही विवाहबद्ध होत आहेत. दोन दिवसांपूर्वी रश्मीने मेहेंदी सोहळा साजरा केला त्यानंतर काल हळदीचा सोहळा पार पडला. रश्मीबद्दल सांगायचं झालं तर ती मूळची  सांगलीची असून वाडिया कॉलेजमधून तीने आर्ट्समधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. यासोबतच ती एक इंटेरिअर डिझायनर देखील आहे. रश्मीला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड होती. कथ्थक, साल्सा, बेलीडान्स, भरतनाट्यम, लॅटिन अशा विविध फॉर्म मधून नृत्याचे धडे गिरवले आहेत.

rashmi patil weds akshay
rashmi patil weds akshay

लावणी नृत्य ही तिची विशेष आवड असून सुपरहिट मराठी लावणी या शोमधून तीने आपल्या अदाकारीने रसिकांना घायाळ केले होते. यासोबतच विविध चित्रपटातून आयटम सॉंगही तिने साकारले आहेत. नृत्यात निपुण असलेल्या रश्मीने सुरुवातीला मॉडेलिंग क्षेत्रातही आपला जम बसवला होता. प्राजक्ता, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकेतून तीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. एक गाव बारा भानगडी या वेबसिरीजमध्येही ती झळकली. कारभारी लयभारी मालिकेतून तिच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला. यात तीने साकारलेली शोना मॅडम ही विरोधी भूमिका प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहिली होती. रश्मी पाटील आणि अक्षयच्या या नवीन प्रवासासाठी चाहते त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.