Breaking News
Home / मालिका / कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार ही गोड बालकलाकार ..

कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार ही गोड बालकलाकार ..

काही दिवसांपूर्वीच रंग माझा वेगळा या मालिकेतील बालकलाकार साइशा भोईर हिने मालिका सोडली असल्याचे जाहीर केले होते. साइशाने या मालिकेतील कार्तिकीची भूमिका खूपच सुरेख वठवली होती. या भूमिकेमुळे सोशल मीडिया स्टार असलेली साइशा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. साइशा ही मालिका सोडणार असे कळल्यावर मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. आता कार्तिकीच्या भूमिकेत साइशा नसणार हे कळल्यावर प्रेक्षकांनी आता मालिका पाहायला मज्जा येणार नाही अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. साइशा भोईर हिने मालिका सोडण्याचे कारण सांगितल्यावर या नाराज प्रेक्षकांनी तिचे कौतुक केलेले पाहायला मिळाले.

maitreyee date rang majha vegala
maitreyee date rang majha vegala

साइशा गेल्या काही दिवसांपासून आपल्या शाळेला खूपच मिस करत होती. मालिकेत तिची भूमिका खूप महत्वाची मानली जायची. त्यामुळे इतर कलाकारांपेक्षा तिचे पॅकअप खूप उशिरा व्हायचे. शिवाय घरापासून शूटिंगला जायला दोन ते तीन तास तिला लागायचे मग दिवसाचे दहा बारा तास शूटिंग करून रात्री १० वाजता पॅकअप करून ती घरी जायची त्यामुळे साइशाला खूपच त्रास जाणवत होता. मालिकेतून काम करून कंटाळलेली साइशा आपल्या शाळेला खूपच मिस करत होती. तिचे बालपण तिला हवे तसे जगता यावे याच निर्णयामुळे तिने मालिकेतून काढता पाय घेतला असल्याचे सांगितले. शाळेच्या कारणास्तव साइशाने ही मालिका सोडल्याने तिच्या चाहत्यांनी तिचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळत आहे.

rang majha vegala maitreyi spruha dali
rang majha vegala maitreyi spruha dali

तिच्या जागी कोण बालकलाकार झळकणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. कार्तिकीच्या भूमिकेसाठी बालकलाकाराची निवड करण्यात आली असून तिने चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. या नव्या कार्तिकीचे नाव आहे मैत्रेयी दाते. मैत्रेयी ही देखील साइशा प्रमाणेच खुपच गोड दिसत आहे. मैत्रेयीला अभिनय आणि नृत्याची विशेष आवड आहे, ती शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत आहे. मैत्रेयीला बालनाट्यातून तसेच व्यावसायिक जाहिरातींमधून झळकण्याची संधी मिळाली आहे. मालिकेच्या सेटवर मैत्रेयीची दीपिका म्हणजेच स्पृहा दळी सोबत चांगली गट्टी जमली आहे. छान बॉंडिंग जुळून आल्याने मैत्रेयी कार्तिकीची भूमिका उत्तम निभावेल अशी खात्री आहे. या भूमिकेसाठी मैत्रेयीचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

One comment

  1. Miss you saisha kartiki mala khup tuje bolan tuje performance ekdam lay bhari mala khup avdtes saisha miss you

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.