Breaking News
Home / बॉलिवूड / राखी सावंतच्या नवऱ्यावर आणखी एका मुलीने लावला आरोप.. म्हैसूर मध्ये एफआयआर केली दाखल
rakhi sawant and adil durrani
rakhi sawant and adil durrani

राखी सावंतच्या नवऱ्यावर आणखी एका मुलीने लावला आरोप.. म्हैसूर मध्ये एफआयआर केली दाखल

आपली फसवणूक केल्या प्रकरणी राखी सावंत हिने पती आदिल दुराणी विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एवढेच नाही तर आपल्याकडून त्याने दीड कोटी रुपये बिझनेससाठी घेतले होते, हे पैसे तो परत करत नसल्याचे राखीचे म्हणणे आहे. आदिल आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. त्याने आपल्याला मारहाण केली असे म्हणत तिने तक्रारीत म्हटले होते. यानंतर आदिलला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राखीचे अनेक अश्लील व्हिडीओ आदिलकडे आहेत. या व्हिडिओमुळे तो राखीला ब्लॅकमेल करत आहे.

rakhi sawant and adil durrani
rakhi sawant and adil durrani

आदिलविरोधात आता आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हैसूर येथील विवी पुरम पोलीस चौकीत एका इराणी विद्यार्थिनीने आदिल विरोधात बलात्काराची केस दाखल केली आहे. यामुळे आदिलवर कलम ३७६, ४१७, ४२०,५०४ आणि कलम ५०६ अंतर्गत बलात्काराची केस दाखल करण्यात आली आहे. या इराणी मुलीचे नाव जाहीर केले नसले तरी आता आदिलच्या अडचणीत आणखी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. याअगोदर आदिलचे अनेक मुलींसोबत संबंध होते असे राखीने मीडियाशी बोलताना म्हटले होते. तर जिच्यामुळे आदिलला जेलमध्ये जावे लागले ती तनु चंदेल गेल्या काही दिवसांपासून आदिलसोबत होती. आदिल खूप समजूतदार व्यक्ती आहे तो राखीच्या जाळ्यात कसा काय अडकला हे नसमजणारं एक कोडं आहे.

adil durrani with rakhi
adil durrani with rakhi

वो बहुत सुलझा हुआ आदमी है असे म्हणत तनु चंदेल हिने आदिलची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. राखी मराठी बिग बॉसच्या घरात होती तेव्हा आदिल तनु सोबत फिरत होता. हे समजले तेव्हापासून राखी हात धुवून आदिलच्या पाठीमागे लागली आहे. आदिलने फसवलं, आपल्याकडून पैसे उकळले आणि माझे व्हिडीओ व्हायरल करण्याची तो धमकी देतो असे आरोप तिने लावले होते. सध्या आदिल न्यायालयीन कोठडीत आहे, मात्र आता इराणी मुलीच्या आणखी एका तक्रारीनंतर तो चांगलाच गोत्यात आला आहे. यासोबतच आदिलचे डॉ रोशिना दिलावरी हिच्याशी देखील संबंध होते असे नुकतेच समोर आले आहे. डॉ रोशिना ही म्हैसूर येथेच वास्तव्यास आहे. मात्र मला या गोष्टीत अडकवू नका, माझा या गोष्टींशी काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण तिने दिले आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.