Breaking News
Home / मराठी तडका / आई कुठे काय करते मालिकेतून अनघाची होणार एक्झिट?.. हे आहे कारण
ashvini mahangade aai kuthe kay karte serial
ashvini mahangade aai kuthe kay karte serial

आई कुठे काय करते मालिकेतून अनघाची होणार एक्झिट?.. हे आहे कारण

आई कुठे काय करते मालिकेतून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेत अनघाची भूमिका अश्विनी महांगडे हिने साकारली होती. गेल्या अनेक वर्षांपासून अश्विनी महांगडे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अस्मिता या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या घरात पोहोचली होती. तर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत तिने रानुअक्काचे पात्र गाजवले होते. पण आता अश्विनी आई कुठे काय करते मालिकेतून एक्झिट घेत असल्याचे समोर आले आहे. त्याला कारणही तेवढेच खास आहे. अश्विनी महांगडे हिला चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. आजवर अश्विनी सहाय्यक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र आता प्रथमच मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे.

ashvini mahangade aai kuthe kay karte serial
ashvini mahangade aai kuthe kay karte serial

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या तिच्या चित्रपटाची घोषणा आज करण्यात आली असून, ती चित्रपटात अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे अश्विनी आई कुठे काय करते मालिकेतून एक्झिट घेत असल्याचे सांगितले जाते. आज वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांचा स्मृतिदिन आहे. याचे औचित्य साधून अश्विनीने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलेली पाहायला मिळते. या चित्रपटातून प्रथमच अश्विनी मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत झळकत आहे. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात तिने एक महत्वाची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता तिच्याकडे हा मोठा प्रोजेक्ट आल्याने ती आपल्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. खरं तर ही भूमिका साकारण्याची जबाबदारी फार मोठी आहे.

punyashlok ahilyabai holkar
punyashlok ahilyabai holkar

मनावर मोठं दडपण असलं तरी मी या भूमिकेसाठी उत्सुक असल्याचे अश्विनी म्हणते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात अहिल्याबाई होळकर यांच्या गेटअप मधला अश्विनीचा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुशांत सोनवले यांचे असून सोमनाथ शिंदे यांची निर्मिती असणार आहे. तर गीतकार म्हणून गुरू ठाकूर ही जबाबदारी पार पाडणार आहेत. येत्या काही दिवसातच चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल असे बोलले जात आहे. वेळेअभावी आई कुठे काय करते मालिकेतून अश्विनीला एक्झिट घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अनघाची भूमिका आणखी कोणी दुसरी अभिनेत्री साकारणार की ब्रेक घेऊन अश्विनी पुन्हा या मालिकेत रुजू होणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.