Breaking News
Home / मालिका / प्रार्थना बेहरेला सुट्टी मिळाली खरी, पण नेहाला सुट्टी नाही..

प्रार्थना बेहरेला सुट्टी मिळाली खरी, पण नेहाला सुट्टी नाही..

टीव्ही मालिकांचे तंत्रच काही वेगळ असतं, इकडे अठरा अठरा तास काम केलं जातं. प्रेक्षकांसमोर येणाऱ्या वीस मिनिटाच्या एका एपिसोड साठी कलाकार खूप मेहनत घेत असतात. मग जेव्हा कलाकारांना मोठी सुट्टी हवी असते तेव्हा मालिकेतील ट्रॅक बदलले जातात. त्यात जर सुट्टीवर जाणारे कलाकार मुख्य व्यक्तिरेखा साकारत असतील तर त्यांच्या सुट्टीच्या काळात मालिकेत बदल हे करावेच लागतात. असाच बदललेला ट्रॅक सध्या पाहायला मिळत आहे तो माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत. या मालिकेची मुख्य नायिका म्हणजेच नेहा ही व्यक्तिरेखा साकारत असलेली प्रार्थना बेहरे सध्या लंडनमध्ये तिच्या पतीसोबत फिरायला गेली आहे.

prarthana behere yash neha
prarthana behere yash neha

प्रार्थनाला जरी या मालिकेतून सुट्टी मिळाली असली तरी तिच्या नेहा या भूमिकेला मात्र सुट्टी नाही. म्हणूनच प्रार्थना लंडनमध्ये काही सीन शूट करणार आहे. प्रार्थनाने इन्स्टापेज वरून एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना ही माहिती दिल्याने तिचे चाहतेही खूप खुश झाले आहेत. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे . या मालिकेत यश आणि नेहा यांचं लग्न झाल्याचं आजोबांना सांगितल्यामुळे त्यांची तब्येत सुधारली आहे. पण अजून परही नेहाची मुलगी आहे हे सत्य अजून समोर आलेले नाही. यामुळेच नेहा आणि यश यांची वेगळीच तारेवरची कसरत सुरु आहे. त्यातच घरच्यांच्या नकळत केलेली सिमीची कटकारस्थानेही काही कमी नाहीत.

pari prarthana abhishek jawkar
pari prarthana abhishek jawkar

माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका प्रेक्षकांसाठी रोज नवनवी उत्सुकता घेऊन येत असते. मालिकेतील कथानक पुढे सरकत असतानाच वैयक्तिक कारणासाठी नेहा म्हणजेच प्रार्थनाला सुट्टी हवी होती. प्रार्थना आणि पती अभिषेक यांनी लंडनला जाण्याचा प्लॅन केला होता आणि त्यासाठी या मालिकेतून थोड्या दिवसांचा ब्रेक मागितला. आता प्रार्थनाच साकारत असलेली नेहा या मालिकेतील केंद्रबिंदू असल्याने पुढच्या भागात बदल करणं स्वाभाविकच होतं. प्रत्यक्ष आयुष्यात प्रार्थना लंडनला गेली त्याप्रमाणे मालिकेतील नेहा कामत हिला सुद्धा कंपनीच्या कामासाठी लंडनला गेल्याचे दाखवण्यात आले. यावर परी आणि नेहा यांच्यातील दुराव्याचे काही भावनिक सीनही गेल्या काही एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

पण प्रत्यक्षात प्रार्थना सुट्टीवर गेल्यानंतर पुढे मालिकेत नेहा दिसणार का? तिने मालिका तर सोडली नसेल ना, असे प्रश्न देखील प्रेक्षकांना पडले होते. याचे उत्तर या मालिकेच्या क्रिएटीव्ह टीमने शोधून काढले आहे. लंडनला गेलेली नेहा परी आणि यशला मिस करीत असून त्यांचे फोन वरील संभाषण दाखवण्यात येणार आहे. यासाठी प्रार्थना बेहरे ही लंडन मधून काही सीन शूट करून पाठवणार आहे. लंडन मधून नेहा, यश आणि परीला फोन तर करू शकतेच ना असं म्हणत प्रार्थनाने लंडनमधून शूट करणार असलेल्या काही सीन्सची माहिती दिली. मालिकेने एक नवा ट्रेंड आणला आहे, ज्यामध्ये प्रार्थना बेहरे ही तिच्या खऱ्या खऱ्या लंडन ट्रिपमध्ये मालिकेतले सीन शूट करून ट्रीप आणि काम हे दोन्ही करणार आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.