Breaking News
Home / मराठी तडका / पूजा सावंत आणि सिद्धेशचा साखरपुडा संपन्न.. लग्नाच्या विधींना झाली सुरुवात
pooja sawant wedding
pooja sawant wedding

पूजा सावंत आणि सिद्धेशचा साखरपुडा संपन्न.. लग्नाच्या विधींना झाली सुरुवात

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळाली. सिद्धेश सोबत एंगेज असलेल्या पूजाने कधी लग्न करणार हे गुपित ठेवले होते. मात्र आता तिच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. काल शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेशसोबत साखरपुडा केलेला आहे. मुंबईत एका खास ठिकाणी सिद्धेश आणि पूजा सावंत दोघेही विवाहबद्ध होत आहेत. साखरपुड्याच्या दिवशी पूजाने सफेद रंगाचा डिझायनर घागरा घातला होता. तर सिद्धेशनेही सफेद रंगाचा कुर्ता परिधान केला होता. सिद्धेशला माझ्यावर सफेद रंग खूप आवडतो असे तिने एका मुलाखतीत म्हटले होते.

pooja sawant wedding photos
pooja sawant wedding photos

साखरपुड्याची थीम पूजाने सिद्धेशच्या आवडी नुसार ठरवली होती. या साखरपुड्याला वैभव तत्ववादी, भूषण प्रधान यांनी हजेरी लावली होती. पूजा विवाहबद्ध होत आहे त्या ठिकाणी मीडियाला येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरच उभ्या असलेल्या मीडियाला पूजा आणि सिद्धेशने येऊन पोज दिलेली पाहायला मिळाली. साखरपुड्याच्या आधी आणि साखरपुडा झाल्यानंतर पूजाने सिद्धेशसोबत मीडियाला पोज दिली होती. तर लवकरच या दोघांचा संगीत सोहळा पार पडणार आहे. भूषण प्रधान, प्रार्थना बेहरे, गश्मीर महाजनी, गौरी महाजनी, फुलवा खामकर आणि वैभव तत्ववादी या सर्वांनी पूजा आणि सिद्धेशच्या संगीत सोहळ्यात नाचण्यासाठी तयारी केली आहे. मेंदी, हळद आणि लग्न असा हा तीन दिवसांचा सोहळा पार पडणार आहे.

pooja sawant siddesh chavan wedding
pooja sawant siddesh chavan wedding

सिद्धेश हा परदेशात वास्तव्यास असतो त्यामुळे त्याला जसा वेळ मिळेल तसे आम्ही लग्न करणार असे पूजाने म्हटले होते. काही दिवसांपूर्वी पूजाने प्रार्थना बेहरे सोबत जाऊन लग्नाची खरेदी केली होती. त्यामुळे ती लवकरच लग्न करणार अशी हिंट मिळाली होती. दरम्यान हे लग्न मुंबईतच होणार असे पूजाने सांगितले होते. लग्नात कुणालाही पोहोचायला उशीर होऊन नये म्हणून तिने हे लग्न मुंबईतच करणार असे स्पष्ट केले होते. डेस्टिनेशन वेडिंगपेक्षा माझं लग्न सगळ्यांनी अटेंड करायला हवं एवढीच तिची यामागची भावना होती. पूजाने अजून तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केलेले नाहीत. त्यामुळे लग्न झाल्यानंतरच ती हे फोटो सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तिच्या या लग्नाची लगबग पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.