Breaking News
Home / मराठी तडका / मराठी सृष्टीतील दोन अभिनेत्रींची लगीनघाई.. हळदी, संगीतचे खास फोटो

मराठी सृष्टीतील दोन अभिनेत्रींची लगीनघाई.. हळदी, संगीतचे खास फोटो

​​मराठी सृष्टीतील छोट्या पडद्यावरील तब्बल दोन अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत. नुकतेच हृता दुर्गुळे हिच्या लग्नाचा थाट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. हृताच्या पाठोपाठ आता मालिका सृष्टीतील आणखी दोन​ अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला​​ मिळत ​​आहे. जय जय स्वामी समर्थ या लोकप्रिय मालिकेतील कालिंदी म्हणजेच अभिनेत्री पूजा रायबागी आणि अभिनेता प्रसाद दाबके यांच्या मेहेंदीचा सोहळा काल पार पडला. तर आज त्यांच्या हळदीचा सोहळा मोठ्या थाटात रंगलेला पाहायला मिळत आहे. हे दोघेही लवकरच विवाहबद्ध होत आहेत. फोर डेज टू गो असे म्हणत पूजाने आपल्या येऊ घातलेल्या लग्नाचे संकेत दिले होते.

pooja raibagi prasad dabke sangeet
pooja raibagi prasad dabke sangeet

प्रिवेडिंग फोटो शूट नंतर आता पूजाच्या मेहेंदी सोहळ्याचा थाट तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.​ संगीत सोहळ्यात पूजाने वेगवेगळ्या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. हळदीच्या सोहळ्यातला तिचा लूक नुकताच समोर आला आहे​.​ पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पूजा अधिकच खुललेली पाहायला मिळत आहे. पूजा विवाहबद्ध होत ​असलेला अभिनेता प्रसाद दाबके याने अनेक लोकप्रिय मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच प्रसाद व्यावसायिक फोटोग्राफर आहे. पूजा रायबागी या अभिनेत्री सोबतच मराठी मालिका सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे प्रणाली नांगरेपाटील.

pranali nangare aniket chavan haldi
pranali nangare aniket chavan haldi

प्रणाली सध्या सन मराठीवरील सुंदरी या​ मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. याशिवाय झी मराठीवरील घेतला वसा टाकू नको या मालिकेतून तिने अभिनय साकारला होता. काही महिन्यांपूर्वीच प्रणाली नांगरेपाटील आणि अनिकेत चव्हाण यांचा साखरपुडा पार पडला होता. गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रणालीच्या घरी लग्नाची लगबग सुरू झालेली पाहाय​​ला मिळत आहे. मेहेंदीच्या सोहळ्यानंतर प्रणालीचा हळदीचा लूक नुकताच समोर आला आहे. त्यामुळे आता प्रणाली​ आणि अनिकेतच्या लग्नाची घटिका जवळ आलेली पाहायला मिळत​ आहे. मराठी सृष्टीतील या दोन्ही अभिनेत्रींना आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.