जागतिक महामारीच्या या काळात अनेक मुलांनी आपले पालक गमावलेले आहेत. अशा काळात मदतीचा हात म्हणून अनेक सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. मागील दोन वर्षात कोणी एक पालक तर कोणी आपले दोन्ही पालक गमावले असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. अशा परिस्थितीमुळे त्यांचा होणारा मानसिक ताण आणि आर्थिक संकट दूर करणे गरजेचे आहे.
अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचा पती विवेक अग्निहोत्री यांनी एक पाऊल पुढे येऊन अशा अनाथ आणि गरजू कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री हे गेल्या काही वर्षांपासून ‘ आय एम बुध्दा ‘ फाऊंडेशन चालवत आहेत. अनाथ मुलांसाठी त्यांनी समुपदेशन सत्र आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे मोलाचे काम आजवर केले आहे. एवढेच नाही तर मागील दोन वर्षात चित्रपट क्षेत्रातील आर्थिक परिस्थितीने हतबल झालेल्या कलाकारांसाठीही फाउंडेशन मार्फत मोठी मदत केली जात आहे. ‘नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स’ (एनसीपीसीआर) महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय बाल हक्क संरक्षण अयोगाबरोबर या दोघांनी एक करार केला आहे. त्यात ते म्हणतात की या अनाथ मुलांसाठी किंवा विलगिकरण वेगवेगळ्या सत्रातून मार्गदर्शन केले जात आहे. बहुतेकदा ही मुले त्यांच्या नातवाईकांकडे असतात मात्र पालक गमावलेल्या ह्या मुलांना समजून घेण्यास आणि त्यांचे योग्य पालन पोषण करण्यासाठी काही नातेवाईक कुठेतरी कमी पडतात. अशा वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे, याच उद्देशाने त्यांनी हे मदत कार्य करण्याचे ठरवले आहे.
मदतीचा खारीचा वाटा उचलण्यासाठी शक्य ते donate करा.
iambuddha Foundation –https://iambuddha.net/donate/
View this post on Instagram