Breaking News
Home / ठळक बातम्या / पाहिले न मी तुला मालिकेतील अभिनेत्रीचा झाला भीषण अपघात
pahile na mi tula serial
pahile na mi tula serial

पाहिले न मी तुला मालिकेतील अभिनेत्रीचा झाला भीषण अपघात

झी मराठी वाहिनीवर महेश कोठारे यांची निर्मिती असलेली पाहिले न मी तुला ही मालिका प्रसारित होत होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेचे कथानक दमदार नसले तरी उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या मालिकेतील उषा मावशी, अनिकेतची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री “वर्षा दांदळे” यांचा भीषण अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये त्यांच्या पाठीच्या मणक्याला आणि उजव्या पायाला भयंकर दुखापत झाली आहे.

pahile na mi tula serial
pahile na mi tula serial

मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि यातून सुखरूप बारी व्हावी अशी ईच्छा त्यांनी आपल्या चाहत्यांकडे व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी आपल्या या भीषण अपघाताची माहिती दिली होती. तयांचया चाहत्यांनी आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या कलाकार मंडळींनी त्यांना काळजी घेण्यास सांगितले आहे व लवकर बरे व्हाल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही बातमी देताना त्यांनी आपला सद्य स्थितीला एक फोटो शेअर केला त्यात त्या खूपच असहाय्य वाटल्या. वर्षा दांदळे यांनी आजवर आपल्या अभिनयाने मराठी सृष्टीत चांगलाच ठसा उमटवला आहे. वर्षा दांदळे या उत्कृष्ट गायिका देखील आहेत लग्नानंतर त्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहू लागल्या. सुरुवातीला संगीत शिक्षिकेची त्या नोकरी करत होत्या. इथूनच त्यांना नाटकातून काम करण्याची संधी मिळत गेली त्यांचे काम प्रेक्षकांना खूप आवडू लागले होते. अनेकदा मालिकांमधून त्याच्या गायकीची झलक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.

actress varsha dandale news
actress varsha dandale news

नकटीच्या लग्नाला यायचं हं, नांदा सौख्य भरे, मालवणी डेज या आणि अशा अनेक गाजलेल्या मालिकेतून आणि नाटकांमधून त्यांनी उत्तम अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनात पाडली होती. या मालिकेत त्यांनी वच्छी आत्या चे पात्र गाजवले होते. त्यांची ही भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. बहुतेकदा याच नावाने प्रेक्षक त्यांना ओळखुही लागले होते. अभिनया सोबतच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेलं एक नाटक रंगभूमीवर आलं होत. सवेरे वाली गाडी असं या नाटकाचं नाव होतं, वय वर्ष ​४० ते ​५० मधल्या बहुतांशी बायकांचं हे रडगाणं त्यांनी या नाटकात मांडलं होतं. हे नाटक त्यांच्याच स्वानुभवावर आधारित असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे संगीत, अभिनय आणि दिग्दर्शन अशा तिन्ही भूमिकांचा वर्षा दांदळे यांनी अनुभव घेतला आहे. सध्या अपघातामुळे त्यांची शारीरिक अवस्था खूपच नाजूक झाली आहे. यातुन त्या लवकरात लवकर उपचार घेऊन बऱ्या व्हाव्यात हीच एक सदिच्छा..

senior varsha dandale
senior varsha dandale

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.