Breaking News
Home / मालिका / नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस.. या अभिनेत्रीने साकारली मुख्य नायिका

नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस.. या अभिनेत्रीने साकारली मुख्य नायिका

मालिकेतून मुख्य नायक नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे खरं तर प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. अशीच नामी संधी दोन गुणी कलाकारांना मिळाली आहे. झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राज हंचनाळे आता लवकरच एका नव्या मालिकेचा नायक बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राजने सन्नीदाची भूमिका साकारली होती. विहिरीत सरबत बनवायचं, नाहीतर गोळीच घालीन हे त्याचे मालिकेतील डायलॉग खूपच प्रसिद्धीस आले होते. सन्नीदाचे पात्र सहाय्यक असले तरी या मालिकेने राजला एक नवी ओळख मिळवून दिली होती.

new marathi serial
new marathi serial

राज हंचनाळे आता नव्या मालिकेतून मुख्य नायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे आणि त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. प्रोमो मधूनच मालिकेचा नायक अर्जुन आणि त्याची कानडी भाषेत बोलणारी नायिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. ही नवोदित अभिनेत्री कोण? असा प्रश्न या प्रेक्षकांना पडला आहे. आज या सुंदर नायिकेबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच सुरू होत असलेल्या या मालिकेचे नाव जाहीर केले नसले तरी या प्रोमोने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मालिकेत राज हंचनाळे अर्जुनची भूमिका साकारणार आहे तर त्याच्या सोबत प्रतीक्षा शिवणकर ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

pratiksha shiwankar raj hanchanale
pratiksha shiwankar raj hanchanale

प्रतिक्षाने निभावलेली ही कानडी नायिका प्रेक्षकांना खूपच भावली आहे त्यामुळे तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रतीक्षा शिवणकर ही मूळची गडचिरोलीची सध्या ती कुटुंबासोबत मुंबईत वास्तव्यास आहे. प्रतीक्षा विवाहित असून नोव्हेंबर २०१९ मध्ये डॉ अभिषेक साळुंके सोबत तिने मोठ्या थाटात लग्न केले होते. डॉ अभिषेक हे रेडीओलॉजिस्ट म्हणून मुंबईत कार्यरत आहेत. अभिनया सोबतच प्रतीक्षाला नृत्याची देखील विशेष आवड आहे. कॉलेजमध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रमातून तिने सहभाग दर्शवला होता. अभिनयाची आवड तिला प्रशांत दामले यांच्या टी स्कुलमध्ये घेऊन गेली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परफॉर्मन्स डेव्हलपमेंट कोर्स इन थिएटर आर्टसचे तिने अभिनयाचे धडे गिरवले आहेत.

यातूनच प्रतीक्षाला प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकातून अभिनयाची नामी संधी मिळाली. या नाटकातून प्रतीक्षाने साकारलेल्या भूमिकेचे मोठे कौतुक करण्यात आले. कॉलेज डायरी या चित्रपटात प्रतीक्षा महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. स्टार प्रवाहवरील कॉमेडी बिमेडी या शोमध्ये तिने अनेक विनोदी प्रहसन सादर केले होते. आता प्रथमच प्रतिक्षाला आगामी मालिकेतून मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकण्याची संधी मिळाली आहे. दाक्षिणात्य नायिकेची झलक या नव्या मालिकेच्या प्रोमोमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सोनी मराठीवरील ही मालिका प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकून घेणार असा विश्वास आहे. या आगामी मालिकेसाठी प्रतीक्षा शिवणकर आणि राज हंचनाळे यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.