Breaking News
Home / मराठी तडका / मराठी मालिकेतील हे नवीन चेहरे प्रेक्षकांची मिळवताहेत पसंती
new marathi actress
new marathi actress

मराठी मालिकेतील हे नवीन चेहरे प्रेक्षकांची मिळवताहेत पसंती

मराठी मालिका सृष्टीत एक नवा ट्रेंड सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. जुने चेहरे मुख्य भूमिकेसाठी घेण्यापेक्षा आता निर्माते दिग्दर्शकांनी या गोष्टींना बगल देऊन नव्या चेहऱ्यांना अधिक पसंती दिलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठी मालिका सृष्टीत नव्या कलाकारांना मुख्य भूमिकेत झळकण्याची नामी संधी मिळू लागली आहे. मराठी मालिका सृष्टीत प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या या ४ अभिनेत्री नक्की कोणत्या आहेत ते पाहुयात. स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेतील रमाची भूमिका देखील प्रेक्षकांना खूपच भावली आहे. सावळी पण तितकीच देखणी असलेली रमा अक्षयला लवकरच आपलेसे करताना दिसणार आहे. ही भूमिका साकारली आहे शिवानी मुंढेकर हिने.

shivani mundhekar
shivani mundhekar

शिवानीने इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. डान्स आणि अभिनयाची आवड असलेल्या शिवानीची मुरांबा ही पहिलीच मालिका आहे. रमाच्या भूमिकेमुळे शिवानीला चांगली लोकप्रियता मिळू लागली आहे. झी मराठीवरील तू तेव्हा तशी ही मालिका देखील प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या मालिकेतील राधा म्हणजेच रुमानी खरे ही अभिनेत्री प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. आपल्या भूमिकेवर ठाम असलेली स्वतंत्र विचारांची राधा रुमानीने तिच्या अभिनयाने सुंदर वठवली आहे. रुमानी हिने चिंटू सारख्या मराठी चित्रपटांमधुन बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची ती मुलगी आहे. २०१९ साली ‘आई पण बाबा पण’ या नाटकात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

roomani khare
roomani khare

तू तेव्हा तशी या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच एक नव्या दमाची मालिका दाखल होत आहे. कन्नड मराठी भाषेचा बाज असलेली ‘जीवाची होतीया काहिली’ ही नवी मालिका येत्या १८ जुलै पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित केली जात आहे. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रेवती आणि अर्जुनची प्रेमकहाणी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका प्रक्षेपित होण्या अगोदरच प्रोमो मधून या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. त्यात रेवतीची भूमिकाही प्रेक्षकांना विशेष भावली आहे. ही भूमिका साकारली आहे प्रतीक्षा शिवणकर हिने. प्रशांत दामले यांच्या अ‍ॅक्टिंग स्कुलमधून प्रतिक्षाने अभिनयाचे धडे गिरवले आहेत.

pratiksha shiwankar
pratiksha shiwankar

एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकातून ती सहाय्यक भूमिकेत दिसली. जीवाची होतीया काहिली ही प्रतिक्षाची पहिलीच मालिका आहे त्यामुळे तिच्यासाठी ही भूमिका खूपच खास ठरली आहे. स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेत रेवा आणि रमा या दोघी मैत्रिणी पाहायला मिळाल्या. रेवा या मालिकेतून गायब झाली असली तरी लवकरच ती या मालिकेत परतणार आहे. रेवाची भूमिका निशाणी बोरूळे हिने साकारली आहे. निशाणी लवकरच या मालिकेत सक्रिय होणार असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. निशाणी काही म्युजिक व्हिडीओ सॉंगमधून झळकली आहे. मुरांबा या मालिकेतून ती प्रथमच छोट्या पडद्यावर झलकलेली पाहायला मिळाली.

nishani borule
nishani borule

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.