Breaking News
Home / मालिका / अख्खी सिरियलच लाथ मारून हाकलली.. अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
mulgi zali ho marathi serial
mulgi zali ho marathi serial

अख्खी सिरियलच लाथ मारून हाकलली.. अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी २ मे पासून ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील विलास पाटीलचे पात्र साकारणारे अभिनेते किरण माने यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे कळल्यावर किरण माने यांनी एक पोस्ट लिहिली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रेक्षक लै लै लै नादखुळा असत्यात भावांनो. मला काल वाढदिवसाची सगळ्यात मोठी गिफ्ट कुनी दिली आसंल, तर ती प्रेक्षकांनी! जी गोष्ट भलेभले करू शकले न्हाईत, ती त्यांनी एका रट्ट्यात केली!

mulgi zali ho marathi serial
mulgi zali ho marathi serial

एका माजोरड्या प्राॅडक्शन हाऊसचा नक्षाच उतरवला. कटकारस्थान रचून मला बाजूला केल्यानंतर त्या सिरीयलचा टीआरपी असा काय घसरला की चॅनलनं ती अख्खी सिरीयलच प्राईम टाईम मधून लाथ घालून हाकलली! जी सिरीयल शहरी आणि ग्रामीण विभागात मिळून सलग दीड वर्ष बहुतांश एक नंबरवर आनि बर्‍याचदा पहिल्या तीन नंबरमध्ये असायची. ती तीन म्हैन्यात रसातळाला गेली. आता मे महिन्यापासून ती सिरीयल, अतिशय महत्त्वाच्या समजल्या जानार्‍या स्पेशल प्राईम टाईमला दिसनार नाय. फक्त तीन म्हैन्यात हे घडलं. ह्याला म्हन्त्यात पोएटिक जस्टिस. ही गोष्ट साधी नाय भावांनो. सर्वसामान्य जन्तेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याचं लै लै लै खतरनाक उदाहरन हाय. खरा न्याय सर्वसामान्य जन्तेच्या दरबारात असतो.

kiran mane mulgi zali ho
kiran mane mulgi zali ho

लोकप्रतिनिधी निवडतानाबी जन्तेनं अशीच ताकद दाखवली तर भल्याभल्यांना धोबीपछाड बसू शकते, हे इतिहासानं दाखवून दिलंय. “ये पब्लीक है ये सब जानती है” असं त्यो राजेश खन्ना डोळं मिचकावत म्हनत नाचायचा, ते काय खोटं न्हाय. कुनाला वाटत आसंल आता किरन माने नाचत आसंल, खुश झाला आसंल. नाय भावांनो. लढाई संपलेली नाय. मी कायदेशीर मार्गानं लढून तो न्यायबी मिळवनारच हाय. सुट्टी देनार नाय या भंगारांना. पन काही बिकाऊ कलाकारांनी माझ्यावर जे आरोप केले त्या सगळ्यांना प्रेक्षकांनीच सनसनीत, कचकटून थोबाडीत देऊन उत्तर दिलं याचं समाधान मात्र नक्की हाय. कुनीतरी सांगीतलं की ती सिरीयल आता दुपारी दाखवनारेत. हे तर लै बेक्कार भावांनो.

यातही समाधान हे की जे बिचारे हातावर पोट असनारे असत्यात ते स्पाॅटबाॅय पासून मेकअपमन हेअरड्रेसर पर्यन्त त्यांचं पोट सुरू र्‍हानार. बाकी माजोरडे कलाकार कर्मानं मरनार. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी गत हुनार. जिथं फुलं वेचली तिथं गवर्‍या वेचायची वेळ येनार. माझ्यावर कटकारस्थान रचून फायदा कुनाचा झाला आनि नुकसान कुनाचं झालं यावर एक चिंतन शिबीर घ्यावं त्यांनी. बाकी वाढदिवस लैच भारी गेला. तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावानं भारावून गेलो. या वर्षीचा वाढदिवस ‘स्पेशल’ बनवला तुमी. एकेक पोस्ट वाचताना आनंदाश्रू येत होते. लब्यू लब्यू लब्यू लैच मित्रमैतरनींनो ! तुमाला अभिमान वाटंल आसंच काम माझ्या हातनं होत र्‍हाईल याची खात्री देतो. मनापास्नं आभार.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.