Breaking News
Home / मराठी तडका / ६ वर्षांपूर्वी मी ह्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत
neeraj more
neeraj more

६ वर्षांपूर्वी मी ह्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत

आज २५ फेब्रुवारी रोजी मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि नीरज मोरे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २५ फेब्रुवारी २०१६ रोजी मोठ्या थाटात त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला होता. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मृणाल आणि तिच्या नवऱ्याने एकमेकांना शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे. नीरज मोरे ने मृणालसाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ६ वर्षांपूर्वी मी ह्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या आयुष्यातला हा सर्वोत्तम निर्णय ठरला आहे. तिने नेहमीच माझी बाजू ऐकली आहे माझा संघर्ष आणि यश तिने पाहिले आहे.

neeraj more
neeraj more

माझी निवड केल्याबद्दल आभार, अशी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी दिलखुलास पोस्ट निरजने मृणालसाठी लिहिली आहे.तर मृणालने देखील निरजसाठी शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे. माझ्या प्रेमळ, काळजी घेणाऱ्या आणि मला समजून घेणाऱ्या नवऱ्याला लग्नाच्या ६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. या सहा वर्षात तू मला खूप काही दिलं आहेस तेही माझ्याकडून कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता. असे म्हणत मृणालने नवऱ्याचे भरभरून कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. मृणाल आणि निरजसाठी हे वर्ष खूप खास आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी बाळाच्या आगमनाची उत्सुकता असल्याचेही ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते आहे.

neeraj more mrunal
neeraj more mrunal

काही दिवसांपूर्वी मृणालने आई होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे बाळाच्या आगमनाची उत्सुकता तिला लागून राहिली आहे. त्यामुळे सध्या तरी मृणाल कुठलाही प्रोजेक्ट स्वीकारणार नाही. मृणाल तिच्या नवऱ्यासोबत परदेशात स्थायिक आहे परंतु लवकरच ती भारतात येईल असे तिने म्हटले आहे. हे मन बावरे, माझिया प्रियाला प्रीत कळेना, अस्स सासर सुरेख बाई या गाजलेल्या मालिकेतून मृणालने मुख्य भूमिका साकारलेल्या आहेत. मालिकांमधून मृणालचा साधेपणा प्रेक्षकांना खूप भावला आहे. तिचा हाच साधेपणा निरजला देखील गोंधळात टाकणारा होता. कारण मृणाल मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असूनही एवढी साधी कशी राहते हा प्रश्न त्याला पडला होता.

ज्यावेळी नीरज मृणालला फाय पाहायला आला होता. लग्नासाठी मृणालचे स्थळ आल्यावर निरजने गुगलवर मृणालचे फोटो पाहिले होते. त्यानंतर तो तिला पाहायला आला तेव्हा त्याने हा प्रश्न तिला विचारला होता. मृणाल उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती उत्कृष्ट गायिका देखील आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसावे. तिच्या स्वतःच्या लग्नाच्या हळदीच्या वेळेस आणि लग्नातही तिने गाणे गाऊन उपस्थितांचीच नव्हे तर निरजचे देखील मन जिंकले होते. मृणालला आणि निरजला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कलाकार टीम आणि रसिक प्रेक्षकांना तर्फे खूप खूप शुभेच्छा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.