Breaking News
Home / जरा हटके / सगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन

सगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन

​मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विभक्त होत असल्याचे कारण मानसीने मीडियाला सांगितले होते. प्रदीप आणि मानसीची ओळख गेल्या काही वर्षांची आहे. दोन वर्षांच्या संकटाच्या काळात हे दोघेही एकत्र लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. तेव्हा प्रदीप खूप चांगला वागत होता, असे मानसीने मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे सगळं एवढ्या घाईघाईने झालं की मला त्यावर विचार करण्याचा वेळच मिळाला नाही. मला लग्न करायचं होतं आणि मी ते केलं असे ती म्हणाली. त्यानंतर प्र​​दीप कसा आहे याचा उलगडा तिला लग्नानंतर होत गेला. प्रदीपने केवळ पैशासाठी आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी माझ्यासोबत लग्न केले होते.

pradeep kharera manasi naik
pradeep kharera manasi naik

माझ्याकडून पैसा मिळत होता तोपर्यंत त्याने चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. माझ्या प्रसिद्धीचा देखील त्याने वापर करून घेतला. पैसे मिळत होते तोपर्यंत तो माझ्याशी चांगला वागत राहिला आणि त्यानंतर त्याने या नात्यातून बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. संसार सुखाचा व्हावा म्हणून नेहमी प्रयत्न करत राहिले मात्र एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जपता. त्यावेळी सगळं मागे सोडून पुढे जाणेच योग्य ठरते. प्रदीपबद्दल मला अजून काही खुलासा करायचा आहे, मात्र ती वेळ आल्यावर मी नक्कीच याचा उलगडा करेन असे मानसी म्हणाली होती. मानसीची घटस्फोटाबाबतची ही प्रतिक्रिया सगळीकडे व्हायरल झाली. या गोष्टीपासून दूर असलेला अनभिज्ञ असलेला तिचा नवरा मात्र मित्रांसोबत आपली ट्रिप एन्जॉय करण्यात मग्न होता.

manasi naik mr india pradeep kharera
manasi naik mr india pradeep kharera

मात्र जेव्हा मानसीने आपल्याबाबत काही गोष्टी उघड केल्या आहेत हे त्याला समजले तेव्हा प्रदीपने मीडियाच्या माध्यमातून बोलण्यास सुरुवात केली. आपण पाहत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका, मीठ सुद्धा साखरेसारखे दिसू शकते. प्रदीपच्या या बोलण्याचा रोख मानसीने लावलेल्या आरोपांवरच होता हे त्याच्या म्हणण्यातून स्पष्ट जाणवत आहे. प्रदीप म्हणतो की, मी स्वतःला खरं समजतो कारण मला शत्रू असण्याची भीती वाटत नाही. मानसी सध्या या दुःखातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी तिने पुन्हा मराठी सृष्टीत पाऊल टाकलं आहे. मीडियासमोर आपल्या खाजगी आयुष्यातली ही खंत तिने व्यक्त करून दाखवली खरी. मात्र या नात्यावर आता प्रदीपने देखील बोलण्यास सुरुवात केली असल्याने दोघांमधला दुरावा आणखीनच वाढू लागला आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.