Breaking News
Home / मराठी तडका / सर्वांना खळखळू हसवणारा एक चतुरस्र अभिनेता..
laxmikant berde memories
laxmikant berde memories

सर्वांना खळखळू हसवणारा एक चतुरस्र अभिनेता..

ज्याने मनापासून सर्वांना हसवले, स्वतःची दुःख विसरून फक्त हसवत राहिला. सारखं सारखं त्याचं झाडावरती काय असं म्हणत पुन्हा पुन्हा चित्रपट बघायला लावला. ही दुनिया मायाजाल म्हणून सावधान ही केलंस. किती आले आणि किती गेले, पण तुझ्यावाचून गंगारामची जादू काही सरली नाही. कवट्या महाकाळ हा मात्र अजूनही गुपित आहे, तुझी खूप आठवण येते रे क्षणोक्षणी. आपल्या अचुक विनोद शैलीने अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा. सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा विनोद वीर लक्ष्मीकांत, सर्वांचा आवडता लक्ष्या. अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर स्वभावामुळे अनेकांची चेष्टा मस्करी करीत सर्वांना खदखदून हसवायचा.

laxmikant berde memories
laxmikant berde memories

घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. छोट्या छोट्या गोष्टींवर विनोद करून आनंद कसा मिळवायचा, विनोदाचा हा अंग त्यांनी त्यांच्या आईकडूनच शिकून घेतला होता. लहानपणी आपण बस कंडकटर व्हायचं आणि तिकिटाचे पैसे मिळवून भरपूर श्रीमंत व्हायचं स्वप्नं पाहिलं. मात्र त्यामागचे खरे सत्य काय होते ते कला क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर उमजले. हम आपके है कौन, अनाडी, साजन अशा हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळू हसवले. तर कधी निरागस अभिनयातून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले. पदार्पणातील प्रसिद्ध हिंदी चित्रपटांनी अमाप प्रसिद्धी मिळवुन दिली होती. हिंदी चित्रपटातल्या काही भूमिका अधोरेखित करणाऱ्या ठरल्या. सिनेमातून हिरो हिरोईनच्या खूप जोड्या गाजल्या.

ashok saraf laxmikant berde
ashok saraf laxmikant berde

तशा काही विनोदी अभिनेत्यांच्या जोड्यांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली. अशीच एक दिलखुलास जोडी म्हणजे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि साथीला महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर. नव्वदच्या दशकात यांच्या या धम्माल जोडीने मराठी सृष्टीत विनोदाचा धुमाकूळ घातला. बिनचूक टायमिंग, तीव्र स्मरणशक्ती, तीक्ष्ण विनोदबुद्धी आणि सोबत सर्वोत्तम अभिनय. ओतप्रोत भरलेल्या माणुसकीमुळे मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीचा लखलखता तारा अचानकपणे कधी निखळला ते कळलेच नाही. मराठी नाटक, दूरदर्शन मालिका अशा प्रवासातून मराठी सृष्टीत भरघोस यश मिळवलं खरं, पण अचानक जाण्याने रसिक जणांच्या मनाला चटका लावून गेला.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.