Breaking News
Home / जरा हटके / ​मराठी सिनेमाची थीम असलेलं पहिलं रेस्टॉरंट.. ​अभिनेत्री प्रिया ​लक्ष्मीकांत ​बेर्डे यांचे​ हॉटेल​ नव्याने सुरु
marathi cinema theme first ever restaurant
marathi cinema theme first ever restaurant

​मराठी सिनेमाची थीम असलेलं पहिलं रेस्टॉरंट.. ​अभिनेत्री प्रिया ​लक्ष्मीकांत ​बेर्डे यांचे​ हॉटेल​ नव्याने सुरु

​​मराठमोळा झटकाचा मधील गावाकडील अस्सल चवीची मेजवानी खवय्ये मंडळींना पुन्हा चाखता येणार आहे. अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पूर्वीचे हे हॉटेल पुणेकरांच्या खास पसंतीचे, अनेक दिग्ग्ज कलाकार मंडळी आणि चोखंदळ खवय्यांनी त्यांच्या हॉटेलला भेट देऊन पदार्थांचे कौतुक देखील केले आहे. बावधन जवळच असलेल्या पौंड रोडवर ‘चख ले’ हे हॉटेल मागे सुरु केले होते. पण मराठमोळा झटकाची सर खवय्ये विसरू शकले नाहीत. आता नव्याने सुरु केलेल्या या रेस्टोरंट मध्ये मराठी चित्रपटांच्या थीमवर आधारित गोष्टींचा रुचकर जेवणासोबत आस्वाद घेता येणार आहे.

marathi cinema theme first ever restaurant
marathi cinema theme first ever restaurant

खास करून लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या धमाल विनोदी जोडीचा, त्यांच्या आठवणींचा खास आढावा यात असणार आहे. “मराठमोळा झटका” हे मराठी सिनेमाच्या थीमचं पहिलं वहिलं रेस्टॉरंट सुरु करण्याचे कारणही त्यांनी सांगितले आहे, “मागील काळात सगळेच होरपळून निघाले त्यात आमच्या मनोरंजन सृष्टी बरोबर आमच्या हॉटेल वर पण परिणाम झाला होता, खरंतर शर्थीने आम्ही ते चालवलं होत पण मार्च मध्ये आम्हाला ते बंद करावं लागलं, ज्या दिवशी बंद केलं त्याच दिवशी ठरवलं आता परत जोमाने उतरायचं, परिस्थिती ला आव्हान देणं आणि तिच्याशी दोन हात करणं हा आता स्वभाव झालाय, त्यानुसार परत आम्ही कंबर कसली आणि आता जोरात सुरवात करतोय आशीर्वाद असावा.. श्री स्वामी समर्थाय नमः”

preeya laxmikant berde new hotel
preeya laxmikant berde new hotel

​हॉटेल व्यवसायात पुन्हा एकदा उचललेलं हे पाऊल सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. नजीकच्या काळात आलेल्या संकटाना सामोरे जाऊन नव्याने स्थापन केलेल्या ह्या हॉटेलमध्ये रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद मिळेल याची खात्री वाटते. न्यू पूना बेकरी समोर, पौड रोड कोथरूड येथील या हॉटेल मध्ये चोखंदळ खवय्यांना काळा मसाला स्पेशल जेवणासोबत चायनीज आणि तंदूर डिशेस चा आस्वाद घेता येणार आहे. ​प्रिया ​लक्ष्मीकांत ​बेर्डे या अभिनय, राजकारण आणि हॉटेल व्यवसाय अशा तिन्ही क्षेत्राची धुरा ​समर्थपणे ​सांभाळताना दिसत आहेत​, त्यांच्या नव्या व्यवसायानिमित्त ​चित्रपटसृष्टीतून शुभेच्छा ​आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. ​​

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.