Breaking News
Home / मालिका / खाजगी आयुष्याबाबत खुलासा करताच महेश मांजरेकर यांनी स्नेहा वाघला सुनावले खडेबोल..
sneha wagh mahesh manjrekar
sneha wagh mahesh manjrekar

खाजगी आयुष्याबाबत खुलासा करताच महेश मांजरेकर यांनी स्नेहा वाघला सुनावले खडेबोल..

मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन स्नेहा वाघच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात नुकतेच सुरेखा कुडची सोबत बोलताना एक खुलासा केला होता, की अविष्कार मला खूप मारायचा, माझ्या चेहऱ्यावर त्याने मारलेल्या खुणा असायच्या.. सकाळी शूटिंगला गेले की तिथले सहकलाकार मला समजून घ्यायचे, मला सावरायला वेळ द्यायचे. संध्याकाळी पुन्हा घरी जायच्या भीतीने मी आणखीन घाबरायचे की माझ्यासमोर आता आणखी कुठले संकट येणार आहे.

sneha wagh mahesh manjrekar
sneha wagh mahesh manjrekar

स्नेहा वाघच्या खुलास्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षक तिची बाजू घेताना दिसत आहेत याचवरून महेश मांजरेकर यांनी चावडीवर स्नेहा वाघला खडेबोल सुनावले आहेत. तू स्वतःच्या वैवाहिक आयुष्याबद्दल असं सांगून प्रेक्षकांची सहानुभूती मिळवत आहेस. आपल्या खाजगी आयुष्याच्या समस्या सर्वांना सांगू नकोस.. असे बोलून एक लगाम त्यांनी स्नेहाला लावला आहे. स्नेहाला असे सूनवल्यावर महेश मांजरेकर यांनी अविष्कारला देखील धारेवर धरून “एक दिवस तुला माझा अभिमान वाटेल असं तू स्नेहाला वचन का दिलंस?” असा सवाल केला आहे. अविष्कार हा स्नेहाचा पूर्वाश्रमीचा पहिला नवरा आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणी तिने त्याच्यापासून घटस्फोट घेतला होता. स्नेहाचे दुसरे लग्न देखील अशाच घरगुती वादामुळे मोडले होते. याच कारणामुळे ती आता सहानुभूती मिळवताना दिसत असल्याची चर्चा आहे.

avishkar darvekar sneha wagh big boss marathi
avishkar darvekar sneha wagh big boss marathi

दरम्यान अविष्कार दारव्हेकर बिग बॉसच्या घरात राहून स्नेहाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एकदा त्याने असेच एकाकी वाटू लागल्याने जवळच असलेल्या स्नेहाला मिठी मारली होती याशिवाय बीग बॉसच्या घरात आल्यावर एक कविता देखील त्याने ऐकवली होती. ती कविता स्नेहाच्या आयुष्याशी मिळतीजुळती असल्याने अविष्कारने ही कविता तिच्याचसाठी म्हटली अशी चर्चा होती. त्यामुळे अविष्कारने दिलेल्या वचनावर महेश मांजरेकर यांनी चावडीवर त्यांना खडेबोल सूनावले. या टिकेनंतर आता स्नेहा बिग बॉसच्या घरात राहून प्रेक्षकांचे कसे मनोरंजन करते हे येत्या काही दिवसातच पाहायला मिळेल…

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.