Breaking News
Home / मालिका / झी मराठीवरील ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप… नव्या शो ची होणार एन्ट्री

झी मराठीवरील ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप… नव्या शो ची होणार एन्ट्री

झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन रिऍलिटी शो दाखल होणार आहे. त्यामुळे जुन्या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घेण्याची वेळ लवकरच येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मन झालं बाजींद या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेच्या जागी सत्यवान सावित्री ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेनंतर आता झी मराठी वाहिनीवर डान्स इंडिया डान्स हा नवा रिऍलिटी शो दाखल होत आहे. छोट्या कलाकारांसाठी हा शो आयोजित केला असल्याने या शोमध्ये सहभागी होण्यासाठी बालकलाकरांची लगबग सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ऑडिशनद्वारे लिटिल मास्टर्सची निवड करण्यात येणार आहे.

kitchen kallakar
kitchen kallakar

यातून निवडलेले लिटिल मास्टर्स आपल्या नृत्याची जादू दाखवून डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स चा किताब पटकवणार आहेत. या नवीन शोमध्ये सूत्रसंचालन तसेच परिक्षकाची धुरा कोण सांभाळणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. अशा रिऍलिटी शोमध्ये आजवर सिद्धार्थ चांदेकर, सुव्रत जोशी, मृण्मयी देशपांडे यांसारख्या कलाकारांनी सूत्रसंचालन केले आहे मात्र डान्स  महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स शोसाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार हे लवकरच उलगडणार आहे. तूर्तास या नवीन शोच्या आगमनामुळे झी मराठीवरील किचन कल्लाकार हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे बोलले जात आहे.

dance maharashtra dance
dance maharashtra dance

किचन कल्लाकार या रिऍलिटी शोमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल करण्यात आले. महाराज म्हणून प्रशांत दामले यांची जागा आता गेल्या काही दिवसांपासून निर्मिती सावंत सांभाळत आहेत. संकर्षण कऱ्हाडे हा देखील नाटकांच्या दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याने त्याच्या जागी श्रेया बुगडेला पाहिले गेले. संकर्षण नुकताच नाटकाच्या दौऱ्यासाठी लंडनला गेला आहे. त्याच्यासोबत प्रशांत दामले देखील सारखं काहीतरी होतंय या नाटक निमित्त लंडनला रवाना झाले आहेत. तू म्हणशील तसं या नाटकात संकर्षण मुख्य भूमिका साकारत आहे तर सारखं काहितरी होतंय या नाटकाचे दिग्दर्शन त्याने केले आहे.

हे दोन्ही नाटक लंडनला सादर केली जात आहेत, त्यामुळे संकर्षणसाठी हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. किचन कल्लाकार तसेच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ब्रेक घरून तो हे दौरे करत आहे. या व्यस्त शेड्युलचा परिणाम म्हणून आणि कलाकारांचे रिपीट व्हिजीटिंगचा परिणाम म्हणून किचन कल्लाकारचा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही भागांपासून या शोमध्ये तेच तेच कलाकार दाखल झालेले पाहायला मिळाले होते. याचाच अर्थ आता या शोच्या निरोप घेण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे असा अंदाज बांधण्यात येत आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.