एका सामान्य स्त्रीची असामान्य कहाणी – “लता भगवान करे – एक संघर्ष गाथा!”

जीवनसंघर्षावर आधारित ‘लता भगवान करे:एक संघर्षगाथा’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार बद्दल चित्रपटाच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.
पतीच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन अनवाणी पायाने धावत स्पर्धा जिंकणाऱ्या ६५ वर्षीय मराठमोळ्या लता करे यांच्या जीवनसंघर्षावर आधारित ‘लता भगवान करे:एक संघर्षगाथा’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याबद्दल चित्रपटाच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. ही घटना महाराष्ट्राची मान उंचावणारी आहे.
ऐतिहासिक किंवा अलीकडच्या काळातील नावाजलेल्या मोठ्या व्यक्ती, अष्टपैलू खेळाडू यांच्याच जीवनावर आधारित बायोपिक डोळ्यासमोर उभे राहतात. श्रीमंत होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यशाची शिखरे गाठणारे व्यक्तीच त्यांच्या आयुष्यात खडतर संघर्ष करतात असे नाही, तर सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जातात.
या चित्रपटाच्या पोस्टरवरील वयाची साठी गाठलेली स्त्री शेतामध्ये शून्यात नजर लावून बसलेली आहे. त्या शेताला प्रकाशझोत असलेल्या अत्याधुनिक धावण्याच्या मैदानाचे स्वरूप देण्यात आले आहे. १७ जानेवारी २०२० ला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता.

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नवीन देशबोईना यांनी केले असून निर्माता – आराबोथु कृष्णा परमज्योती फिल्म्स क्रिएशन्स यांची प्रस्तुत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे लता करे स्वतःच मुख्य भूमिकेत असून, त्यांचे पती भगवान करे यांनीही यात अभिनय केला आहे. याशिवाय सुनील करे, रेखा गायकवाड, राधा चव्हाण, अजय शिंदे आणि  सोबत  बालकलाकार साक्षी यांच्या भूमिका आहेत.

चित्रपटास प्रशांत महामुनी यांनी संगीत बद्ध केले असून संकलन बोद्दू शिवकुमार व आदित्य सणगरे, कमलेश सणगरे यांनी छायांकन केले आहे.

अफलातून पार्श्वसंगीताची धुरा कन्नू समीर यांनी पेलली आहे. चित्रपट निर्मितीत मोलाचे योगदान दिलेल्या काही व्यक्ती खालीलप्रमाणे.
डीआय – गोविंद कट्टा
कार्यकारी निर्माता – अतुल साबळे
निर्मिती व्यवस्थापक – प्रवीण बर्गे
मेकअप – शीतल कांडरे
ध्वनी मुद्रण – वेंपती श्रीनिवास
पोस्ट प्रोडक्शन – अनलिमिट स्टुडिओ (हैदराबाद)
स्थिर छायांकन – प्रतिक कचरे
पीआर आणि पब्लिसिटी – लीड मीडिया

राजश्री मराठी यांनी प्रदर्शित केलेला चित्रपटाचा टीजर YouTube वर नक्की पहा.

Related Posts

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.