Breaking News
Home / मालिका / किचन कल्लाकार मध्ये वैभव तत्ववादी सोबत आलेली ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण..
actress anjali patil with superstar rajinikanth
actress anjali patil with superstar rajinikanth

किचन कल्लाकार मध्ये वैभव तत्ववादी सोबत आलेली ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण..

​​झी मराठीवरील किचन कलाकार या नव्या शोला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. पदार्थ बनवताना कलाकारांची उ​​डालेली तारांबळ पाहून प्रेक्षकांचे मनरंजन तर होतच आहे. मात्र त्यांच्या रिअल लाईफमधील काही भन्नाट किस्से देखील ऐकण्याची मजा या शोमधून मिळते आहे. कालच्या भागा​​त श्रुती मराठे, वैभव तत्ववादी आणि संतोष जुवेकर या कलाकारांनी हजेरी लावली होती. कलाकारांसोबतच त्यांचे कुटुंब आणि मित्र देखील या मंचावर येताना दिसतात. वैभव तत्ववादीसोबत त्याची एक खास मैत्रीण या मंचावर दाखल झाली होती. त्याची ही खास मैत्रीण कोण आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

actress anjali patil with superstar rajinikanth
actress anjali patil with superstar rajinikanth

वैभव सोबत आलेल्या या अभिनेत्रीचे नाव आहे अंजली पाटील. अंजली ही मूळची नाशिकची, अभिनयाची आवड असल्याने वयाच्या १४ व्या वर्षीच तिने हे क्षेत्र निवडण्याचे ठरवले होते. अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी ती पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये दाखल झाली होती. ललित कलाकेंद्र मधून अभिनयाचे धडे घेतल्यानंतर अंजलीने दिल्ली येथील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला. इथूनच नाटकांमधून तिला वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. अभिनयाचे धडे गिरवत असताना दिग्दर्शनाचे बारकावे तिने शिकून घेतले. यातूनच काही नाटकांचे दिग्दर्शन तिने केले होते. २०११ साली दिल्ली एक दिन या हिंदी चित्रपटातून ती प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकली होती.

beautiful anjali patil
beautiful anjali patil

या चित्रपटात तिने साकारलेली रोहिणी तुफान भाव खाऊन गेली. या भूमिकेनंतर अंजली विविध भाषिक चित्रपटात झळकली. प्रथ्यायम, अपना देस, मेरी निम्मो, मिसेस स्कूटर, चक्रव्युव्ह, ग्रीन बँगल्स, फाईंडिंग फॅनी, न्यूटन. तसेच सुपरस्टार रजनीकांत यांचा काला, कुथीरैवाल, मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर अशा चित्रपट आणि लघुपटातून झळकली. हिंदी, तेलगू, मल्याळम, तमिळ, सिंहली भाषांमधून तिला आजवर महत्वाच्या भूमिकेच्या संधी मिळाल्या आहेत. यासोबतच द सायलेंस, दिठी, मन फकिरा, बार्डो असे मराठी चित्रपट देखील तीने अभिनित केले आहेत. हुतात्मा या मराठी वेबसीरीजमध्ये अंजली आणि वैभव एकत्रित झळकले होते. एकत्रित काम करत असताना दोघांची मैत्री जुळून आली होती.

mann fakira juke box event
mann fakira juke box event

याच मैत्री खातर ती किचन कलाकार शोमध्ये त्याच्यासोबत दाखल झाली होती. त्यामुळे अनेकांना ती कोण असावी याबाबत प्रश्न पडला होता. किचन कलाकारच्या पुढील भागात श्वेता शिंदे, मकरंद देशपांडे आणि देवदत्त नागे हे कलाकार दाखल होणार आहेत. श्वेता शिंदे या शोमध्ये येण्याअगोदर हे तर काहीच नाय या शोमध्ये तिच्यासोबत घडलेले धमाल किस्से सांगण्यासाठी आली होती. त्यामुळे आजच्या भागातही ती अशीच धमाल करणार असल्याचे शोच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते आहे. त्यामुळे आजच्या एपिसोडची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.