Breaking News
Home / मालिका / निरोप घेतो आम्हा आज्ञा असावी.. देवमाणूस २ मालिकेतून अगोदरच एक्झिट झालेल्या अभिनेत्याची प्रतिक्रिया
kiran gaikwad shewta shinde
kiran gaikwad shewta shinde

निरोप घेतो आम्हा आज्ञा असावी.. देवमाणूस २ मालिकेतून अगोदरच एक्झिट झालेल्या अभिनेत्याची प्रतिक्रिया

झी मराठी वाहिनीवर उद्यापासून एक नवी मालिका दाखल होत आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. ही मालिका त्रीनेत्रम या बंगाली मालिकेचा रिमेक असणार आहे. अभिनेत्री तीतीक्षा तावडे या मालिकेत नेत्राचे प्रमुख पात्र साकारत आहे. नेत्रा जे बोलते ते घडत नाही, जे घडणार आहे ते ती बोलते अशी ही नेत्रा गावकऱ्यांच्या रोषाला सामोरी जाताना दिसणार आहे. या मालिकेच्या जागी देवमाणूस २ ही मालिका प्रसारित होत होती. काल या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित करण्यात आला. मालिकेला निरोप देताना कलाकारांनी मात्र या आठवणींचा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

kiran gaikwad devmanus serial
kiran gaikwad devmanus serial

इतर कलाकारांचे शूटिंग चालू असतानाच दोन आठवड्यापूर्वी किरण गायकवाडचे मालिकेतून पॅकअप करण्यात आले होते. त्यामुळे मालिकेतील भूमिकेला असे सोडून जाणे त्याला खूपच त्रासदायक ठरले. खरं तर ही भूमिका विरोधी जरी असली तरी या भूमिकेमुळे किरण प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. ‘निरोप घेतो आम्हा आज्ञा असावी चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी’. असे म्हणत किरणने सेटवरचा निरोप देतांनाचा एक क्षण सोशल मीडियावर शेअर केला. ह्या भूमिकेने मला खूप काही दिले असे किरण आवर्जून सांगतो. निर्माती श्वेता शिंदे हिने दाखवलेला आपल्यावरचा विश्वास आणि दिग्दर्शक राजू सावंत यांच्या साचेबद्ध कलाकृतीतून घडलेला देवमाणूस या मालिकेला यशस्वी करण्यात कारणीभूत ठरला.

kiran gaikwad shewta shinde
kiran gaikwad shewta shinde

हे श्रेय या दोघांचेही आहे हे तो न विसरता सांगतो. या भूमिकेबद्दल लिहिताना तो म्हणतो की, ‘नमस्कार! एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते नीच; हरामी पिलू तयात एक’. भयाण शांतता मेकअप रूम मध्ये, उर भरून आलेला, डोळ्यांची हलकी किनार ओलावलेली शेवटी ती वेळ आलीच “निरोपाची”. आज रात्री देवमाणूसचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. उद्यापासून आमची टीम तुमचं मनोरंजन करायला तुमच्यासमोर नसेल. काल गणपती गेले, जाताना आपल्या बरोबर “देवीसिंग, फेक डॉक्टर, देवमाणूस अशी तोतया माणसं, निगेटिव्ह माणस सोबत घेऊन गेले. खरतर ती या आपल्या आजूबाजूला असतातच गोड बोलून आपल्याला त्यांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतात.

अश्या बुरख्याआड लपलेल्या माणसाचा बुरखा समाजासमोर आणावा तो फाडावा असा आमचा मानस होता. अशी बोलघेवडी माणसं आपल्या आजूबाजूला असतील तर आपण वेळीच सावध होऊया. मालिका संपत असताना बर्‍याच प्रेक्षकांचे फोन, मेसेज येताएत की आम्हाला देवमाणसाचा खूप राग येतो त्याला आम्ही खूप शिव्या ही घालतो. पण ही मालिका बंद नका करू; मालिका संपताना सुद्धा एवढा प्रेक्षकांच प्रेम पाहून भाराऊन जायला होता. डॉ ला फाशी झाली, त्याची तोंडाला काळ फासून धिंड काढण्यात आली. या आणि आजून ज्या महाराष्ट्राच्या ईछ्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या. ही भूमिका करताना खूप मेहनत घ्यावी लागली. कारण अश्या प्रकारची माणस आपल्या आजूबाजूला नसतातच.

मग आता काय तर एक कलाकार म्हणून तुम्हाला एक व्हिज्युअल तयार करून असा एक माणूस उभा करायचा असतो. फक्त उभाच नाही तर तो माणूस खरा आहे, तो असाच वागतो. असाच बोलतो, असाच चालतो असा आभास निर्माण करायचा आहे. दिग्दर्शकाला विचारून हे सगळं करत असताना मानसिक लेवलला खूप दमछाक व्हायची, बर्‍याच गोष्टी स्वभावाच्या विरूद्ध जाऊन कराव्या लागल्या. पण या सगळ्याच चीज झाल. तुम्ही मी करत असलेल्या निगेटिव्ह भूमिकेला सुद्धा इतकं पॉझिटिव्ह प्रेम दिलत. अनेक लोक आहेत ज्यांच्यामुळे हा गोवर्धन पर्वत उचलता आला. इतिहासाला फक्त श्रीकृष्णाची करंगळी दिसेल. पण त्यासोबत हजारो काठ्यांचा टेकू नाही दिसणार “देवमाणूस” हा पर्वत उचलायला ज्यांची ज्यांची मदत झाली त्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद!

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

One comment

  1. Sundara manamadhe bharli Lavkar sampva ….Evdi bakwaas n lokana murkh banavnari malika ajun kasa chalu? Khoti case ubhi kele li ajun mokat firte asa kasa dakhavtat maalikemadhe?Case ch result laglya laglya police tila gheun kasa nahi gele?Lokana evda murkh samajtat ka ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.