सुकन्या कुलकर्णी आणि संजय मोने यांची एकुलती एक कन्या जुलिया हिचे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले आहे. केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा या चित्रपटातून जुलिया झळकणार आहे. चित्रपटातील तिचा एक खास लूक प्रेक्षकांनी हेरला आणि सुकन्या कुलकर्णी यांची लेक अभिनय क्षेत्रात पदार्पण करतेय हे पाहून सगळ्यांना आनंदाचा सुखद धक्काच बसला. बाईपण भारी देवा हा चित्रपट आज ३० जून रोजी प्रदर्शित झाला. आतापर्यंत चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काल दुपारपर्यंत या चित्रपटाचे २८ हजार ९६ लाखांहून अधिक तिकीट विक्री झाली होती.

महिला वर्गाकडून मिळत असलेला प्रतिसाद रोजचा आकडा वाढतच चालला असल्याने कलाकारांना भारावून सोडणारा ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाईपण भारी देवा चित्रपटाचे प्रमोशन दणक्यात सुरू होते. वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन चित्रपटातील कलाकार मंडळी आणि केदार शिंदे महिलावर्ग प्रेक्षकांची भेट घेत होती. सुकन्या कुलकर्णी, दीपा परब, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर प्रेक्षकांशी संवाद साधत होते. या प्रमोशनमुळे चित्रपट गृहात प्रेक्षकांची गर्दी खेचून आणली जात आहे. चित्रपटात जुलियाला देखील एक छोटीशी भूमिका आहे. जुलिया चित्रपटात काम करणार हे सुकन्या कुलकर्णी यांना मुळीच ठाऊक नव्हते. केदार शिंदे आणि अजित भुरे यांना ती लहानपणापासूनच काका म्हणत होती.

दोघांनी जुलियाला बाईपण भारी देवा चित्रपटात काम करण्यासाठी विचारले. त्यावेळी मी काकांना नाही कशी म्हणू असे म्हणत तिने या चित्रपटासाठी होकार दिला होता. आता सध्या जुलिया तिच्या पुढील शिक्षणासाठी प्रदेशात गेली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनला तिला यायला जमले नव्हते. मात्र ती चित्रपटात काम करतीये हे पाहून तिचे परदेशातले मराठी मित्र मैत्रिणी तू अभिनेत्री आहेस का? म्हणून प्रश्न विचारू लागले आहेत. अर्थात जुलिया आता मोठी झाली आहे आणि ती तिचे स्वतःचे निर्णय घेऊ शकते. असे म्हणत सुकन्या कुलकर्णी यांनी तिची पाठच थोपटली आहे. जुलियाला प्राण्यांची विशेष आवड आहे आणि त्यांच्याविषयीचा सखोल अभ्यास जाणून घेण्यासाठी ती परदेशात गेली आहे.